पुणे Manorama Khedkar :बडतर्फ आयएएसअधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दोन वर्षाच्या पूर्वी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आत्ता या प्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला. मनोरमा खेडकर यांचा जामीन न्यायालयानं मंजूर केला आहे.
मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधील लॉजमधून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणात सह आरोपी असलेले पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हा न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरामा खेडकर यांनी लगेच जामीन अर्ज दाखल केला. मात्र, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता.