ठाणे : घर भाडे मागण्याच्या बहाण्यानं घरात घुसून १६ वर्षीय अल्पवयीन भाडोत्री मुलीवर घर मालकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली. ही घटना भिवंडी शहरातील शांतीनगर भागात घडली. याप्रकरणी नराधम मालकावर शांतीनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यान खळबळ उडाली.
नराधमानं केला बलात्कार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम घर मालक आणि पीडिता भिवंडीतील एका वस्तीत राहतात. त्यातच १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पीडिता घरी एकटी असताना नराधमानं घराचे भाडे मागण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. .त्यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी देवून घटनास्थळावरुन पळून गेला.