जळगावात मुस्लिम कुटुंब वाढवतंय होळीचा गोडवा जळगाव Holi 2024 : हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी आणि रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरुन एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव आहे. होळीसाठी लागणारे हार-कटे (हार कंगण) बनवून त्याची विक्री करण्यासाठी वेग आलाय. विशेष म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून जळगावात मुस्लिम बांधव साखरेच्या गाठींचे हार-कंगण बनवून हिंदू बांधवांच्या होळी सणाचा गोडवा वाढवत आहेत.
होळीला हार कंगणचं महत्त्व : दुर्गुणांवर मात करण्याचा आणि उन्हाळा सुखकर करण्याचा सण म्हणजे होळी आहे. होळीला साखरेचे हार व कंगण दिले जातात. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत साखरेच्या हार आणि कंगणाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. सध्या बाजारात होल सेलमध्ये हार आणि कंगण 150 रुपये किलो तर किरकोळमध्ये 200 ते 250 रुपये किलो याप्रमाणे विकले जात आहे. या कारखान्यात यातून एका दिवसाला 400 ते 500 किलो हार व कंगण तयार होत आहेत. जळगाव शहर ही जिल्ह्याची मोठी बाजारपेठ असल्यानं अमळनेरहून दीड महिन्यांसाठी अजिज करीम हलवाई हे येत असतात.
गतवर्षीच्या तुलनेत भाववाढ : जळगाव शहरातील मुस्लीम कुटुंबीय हिंदू बांधवांना सोबत घेत होळी आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे हार-कंगण तयार करत आहेत. यामुळं मुस्लिम हिंदू बांधव एकत्र असल्याचं चित्र आहे. यंदा गतवषीच्या तुलनेत साखर सहा रुपयांनी प्रती किलो महागली आहे. यामुळं हार कट्याच्या दरात वाढ झालीय. रविवारी होळीचा सण आहे. होळीला साखरेचा हार घालून पुजा केली जाते. लहान मुलांना साखरेचा हार तर मुलींना कंगण दिले जातात.
पाच पिढ्यांपासुन सुरू आहे काम : गुढीपाडव्याला गुढीला साखरेचा हार कंगण घातलं जातं. याचा दर सध्या 40 रुपये पावशेर असा आहे. तर किलोचा दर 140 ते 150 रुपये किलो आहे. साखर, कोळसा, दोरा आणि मजुरीचे दर वाढल्यानं हे दर वाढले आहेत. होलसेलचे दर 90 ते 100 रुपये प्रती किलो आहेत. जळगाव येथील नासिर अजीज हलवाई हे सामाजिक ऐक्य जोपासत आहेत. हार आणि कंगण बनविण्याचा त्यांचा छोटा व्यवसाय हा हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक आहे. हा परिवार पाच पिढ्यांपासून मिठाई व्यवसायात आहे. त्यांच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे. ते कासमवाडीत न्यू मिलन हार कंगण नावानं कारखाना महिनाभरासाठी जळगावमध्ये उभारतात. एका महिन्याला हजार किलोचा माल तिथं तयार होतो. हा माल इतर व्यापारी नेऊन त्याची विक्री करतात.
हेही वाचा :
- ठाण्यात जादुई रंगपंचमी; होळीसाठी बाजारपेठेत "कलर लगाओ, कलर भगाओ छू मंतर" - Holi Festival 2024
- निवडणुकीचं टेन्शन विसरून होळीसाठी नवनीत राणा थेट मेळघाटात - Navneet Rana