नाशिक Abu Salem Transferred From Nashik Jail :मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहातून कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं होतं. त्याला या कारागृहातील अंडासेलमध्ये महिनाभर ठेवण्यात आलं. मात्र गुरुवारी रात्री ब्लॅक कमांडोसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन दुसरीकडं हलवण्यात आलं आहे. कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला दिल्ली इथं न्यायालयीन कामकाजासाठी नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम :नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये कुख्यात गँगस्टर अबू सालेम याचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं. अबू सालेमला एका महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून रेल्वेच्या माध्यमातून दिल्लीत हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी जेलरोड परिसरासह नाशिक रोड रेल्वे स्टेशनला छावणीचं स्वरुप आलं.
अबू सालेमला दिल्लीला हलवलं :मुबंईमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अबू सालेमला आज पहाटे नाशिकरोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली इथं नेण्यात आलं. यावेळी नाशिकरोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त लावण्यात आला. मुबंईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्व देश हदरला. मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी अबू सालेमला शोधून काढलं. तपासात हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं.