महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुख्यात गॅंगस्टर अबू सालेम पुन्हा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये; मनमाड रेल्वे स्थानकाला छावणीचं रुप - Gangster Abu Salem - GANGSTER ABU SALEM

Gangster Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमला काही दिवसांपूवी नाशिकच्या सेंट्रल जेलमधून दिल्लीला हलवण्यात आलं होतं. आता पुन्हा अबू सालेमला कडक बंदोबस्तात नाशिकला आणलं आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर तसंच शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Gangster Abu Salem
अबू सालेम नाशिकरोड कारागृहात (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 9:37 PM IST

Updated : Aug 3, 2024, 10:21 PM IST

मनमाड Gangster Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबु सालेमला दिल्ली येथून मनमाडमार्गे नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं आहे. कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकावर आणून त्याला रस्तामार्गे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं. 2002 मध्ये उद्योगपती अदानी यांच्याकडून खंडणी मगितल्याप्रकरणी अबू सालेमवर दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आलं होतं. मात्र दिल्ली कोर्ट सुट्टीवर असल्यानं त्याला 10 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली. यामुळे त्याला पुन्हा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आलं आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर तसंच शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अबू सालेम नाशिकरोड कारागृहात (Source - ETV Bharat Reporter)

रेल्वे स्थानकासह चौकांना छावणीचं रुप :कर्नाटक एक्सप्रेसनं विशेष डब्यात ब्लॅक कमांडो आणि पोलिसांच्या बंदोबस्तात अबु सालेमला मनमाड येथे आणण्यात आलं. येथून पोलीस बंदोबस्तात त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमधे रवाना करण्यात आलं. यावेळी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे मनमाड रेल्वे स्थानक आणि शहरातील अनेक चौकात बंदोबस्त असल्यानं छावणीचं रुप आलं होतं.

पोलिसांची सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकारांवर दादागिरी : अबू सालेम हा कुख्यात गँगस्टर आहे. तो अनेक गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगताय. त्याच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होतात. आजही त्याला एकदम कडक बंदोबस्तात दिल्ली वरून मनमाड स्थानक आणि त्यांनतर नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यासाठी आणण्यात आलं. यावेळी दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलिस यांचा कडक बंदोबस्त होता. यावेळी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना आणि काही पत्रकार यांच्यावरच दादागिरी केली. कोणी शूटिंग करु नये, असं ओरडून सांगत असताना रस्त्यावर येणाऱ्या अनेक प्रवाशांना त्यांनी अर्वाच्य भाषेत बोलून हाकललं.

हेही वाचा

  1. राज्य शासनाचा कौतुकास्पद निर्णय, मानसिक आजारातून बरं झालेल्यांसाठी राज्यात १६ पुनर्वसन गृह उभारणार - Rehabilitation Homes
  2. नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान! महानगरपालिकेकडून रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न, जाणून घ्या नेमका आकडा किती? - Dengue Cases In Nashik
  3. प्रवाशांचे होणार हाल! मुंबईत उद्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक, असं असेल लोकलचं वेळापत्रक - Mumbai Railway Mega Block
Last Updated : Aug 3, 2024, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details