महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case - NAGPUR BHONDUBABA RAPE CASE

Nagpur Bhondubaba Rape Case : नागपूर येथील एका तरुणीला भूतबाधा झाली असल्याचं सांगत 21 पूजा करावी लागेल, असं एका भोंदूबाबानं कुटूंबियांना सांगितलं. त्यानंतर पीडित तरुणीसह, तिची आई, आजी आणि मामीवर या भोंदूबाबाकडून बलात्कार करण्यात आला.

Nagpur Bhondubaba Rape Case
भोंदूबाबाकडून बलात्कार (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 8:33 PM IST

नागपूर Nagpur Bhondubaba Rape Case : नागपुरात एका भोंदूबाबानं भूतबाधेची भीती दाखवून एकाच घरातील चार महिलांवर बलात्कार केला होता. या प्रकरणी 'पोक्सो'च्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी.जयस्वाल यांनी आरोपी भोंदूबाबाला 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे.

अंगात भूत असल्याचं सांगत बलात्कार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना 21 मे 2018. ते 09 जानेवारी 2021च्या कालावधीत घडली. पीडित तरुणी नेहमी आजारी राहात असल्यानं वडील चिंतेत होते. भोंदूबाबाची आणि पीडितेच्या वडिलांची ओळख होती. त्यांनी मुलीच्या आजारपणाची माहिती त्या भोंदूबाबाला दिली. भोंदूबाबानं तरुणीच्या अंगात भूत असल्याचं सांगत 21 दिवस पूजा करावी लागेल, असं कुटुंबियांना सांगितलं. या पूजेसाठी मुलीचे कुटुंबिय तयार झाले. मात्र, पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूबाबा तिच्यावर बलात्कार करत होता.

आई, मामी आणि आजीवरही बलात्कार : पीडित तरुणीमुळं घरातील अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदूबाबानं मुलीची आई, मामी आणि 60 वर्षीय आजीवरही बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला समजल्यावर तिनं मामी व आजीलाही विचारणा केली. चारही महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर 10 जानेवारी 2021 रोजी आरोपी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाला याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचे तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनिल गांगुर्डे यांनी न्यायालयात तपासाअंती दोषारोप पत्र सादर केलं. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड. सोनाली राऊत यांनी तर, आरोपीतर्फे ऍड. अमीत बंड यांनी काम पाहिलं.

आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा : आरोपी भोंदूबाबानं चौघींवर बलात्कार केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयानं दुलेवाला बाबा याला पोक्सो व अत्याचार प्रकरणात 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा

  1. अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणं भोवलं; पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कुऱ्हाड - Mumbai Cops Planting Drugs
  2. बंदाघाटावर महिलेला बोलावलं भेटायला, मग भल्या पहाटे चाकूनं भोसकलं; विवाहितेचा खून करुन तरुणाची आत्महत्या - Man Killed Women
  3. ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault

ABOUT THE AUTHOR

...view details