महाराष्ट्र

maharashtra

शुभ मंगल सावधान...; 'श्रद्धानंद अनाथालय'नं बांधली चार मुलींची लग्नगाठ - Orphan Marriage In Nagpur

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 9:22 PM IST

Updated : Jul 11, 2024, 10:41 PM IST

Orphan Marriage In Nagpur : मानवी जीवनात सोळा संस्कारातील एक गोड संस्कार म्हणजे 'विवाह' असतो. त्यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. त्यामुळंच विवाहाला कर्तव्यही समजलं जातं. तर अगदी लहान वयापासून आई-वडिलांचं छत्र नसलेल्या नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयातील (Shradhanand Orphanage) चार मुलींचा विवाह सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

Shradhanand Orphanage
श्रद्धानंद अनाथालयात विवाह सोहळा (ETV BHARAT Graphics)

नागपूर Orphan Marriage In Nagpur :नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयातील (Shradhanand Orphanage) चार मुलींनी आज वैवाहिक जीवनाला सुरुवात केलीय. या चारही मुलींचा लग्न सोहळा धुमधडाक्यात आणि उत्साहात संपन्न झालाय. या चारही मुली श्रद्धानंद अनाथालयात नवजात असताना दाखल झाल्या होत्या. त्या इथेचं वाढल्या, शिकल्या आणि आज या मुलींची सासरी पाठवणी होत असताना, श्रद्धानंद अनाथालयच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवत या मुलीना आई बापाची माया दिली, त्या सर्वांच्याचं डोळ्यात आज आनंदाश्रू तरळले होते.

श्रद्धानंद अनाथालयातील चार मुलींचा लग्न सोहळा संपन्न (ETV BHARAT Reporter)

अनाथालयातील वातावरण झाले भावुक : एकीकडं देशातील नेते मंडळी, उद्योगपती मुलांच्या लग्न सोहळ्यावर हजारो कोटी रुपयांची उधळण करत असताना, नागपुरात संपन्न झालेल्या हा लग्न सोहळ्याची बात काही ओर होती. एकाच वेळी चार जोडपे हे परिणय सूत्रात बांधले जाणार असल्यानं, श्रद्धानंद अनाथालयातील वातावरण भावुक झाले होते. एकीकडं वर पक्ष वरात घेऊन येत असताना वधू पक्षाला ही लगीन घाई झालेली होती. चार मुलींना आशीर्वाद देण्यासाठी नागपुर शहरातील गणमान्य व्यक्ती हे आवर्जून उपस्थित होते. यामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी हे देखील उपस्थित होते.



गीतांजली बुटी वधूच्या आईच्या भूमिकेत : गेल्या अनेक वर्षांपासून श्रद्धानंद अनाथालयातील मुलींची संपूर्ण जबाबदारी अगदी समर्थपणे आणि निष्ठेने सांभाळणाऱ्या सहसचिव गीतांजली बुटी यांच्या विशेष प्रयत्नांतुन चार मुलीचा लग्नसोहळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे. मुलींसाठी वयात आल्यानंतर त्यांच्यासाठी योग्य वर शोधणं आणि त्यांचे लग्न लावून देण्याच्या कामात गीतांजली या कुठेही कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेताना आज दिसत होत्या. एका अर्थाने त्या वधूच्या आईची भूमिकाचं पार पाडत होत्या.


यांनी केलं कन्यादान: सर्व समाजाला दिशा दाखवण्याऱ्या लग्नसोहळ्यात प्रशांत दूमुके, सचिन पुरोहित, डॉ. अभिजित देव आणि नरेंद्र जिचकार यांनी मुलीचं कन्यादान केलंय.

हेही वाचा -

ऐन लग्नातच पावसाचा धुमाकूळ...; धो धो पावसात नवरदेव-नवरीने केली एन्ट्री... पाहा व्हिडिओ - Wedding Ceremon

RakshaBandhan : अनाथालयातील विद्यार्थिनींनी तयार केल्या ईक्रोफ्रेंडली 5 हजार राख्या, काही तासातच झाली विक्री

Last Updated : Jul 11, 2024, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details