मुंबई Mumbai Metro Phase 3 :अनेक वर्षांपासून आतुरतेनं वाट पाहत असलेल्या मुंबईची पहिली भुयारी मेट्रोचा पहिल्या टप्प्याची सेवा प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे. मेट्रो लाईन तीन, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील सेवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून त्या अनुषंगानं मेट्रो 3 च्या चाचण्या घेण्यास सुरुवात झाली आहे.
'या' स्थानकांचा समावेश :मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेतील 12.5 किमीचा पहिला टप्पा वाहतूक प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. यावर 10 स्थानकांचा समावेश असून त्यातील 9 स्थानक भूमिगत असतील. तर आरे स्थानकात एक टर्मिनस स्टेशन उभारण्यात आलंय. यामध्ये आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, CSMIA T2 (एअरपोर्ट), सहार रोड, CSMIA डोमेस्टिक एअरपोर्ट, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी या स्थानकांचा समावेश आहे. तसंच या मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे.
मेट्रो तीन फेज एक मधील मार्गिका पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या फेजमधील काम मे महिन्यात पूर्ण होईल. यामध्ये वरळी गिरगाव यांचा समावेश असेल तर बीकेसी ते कफ परेड एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल.- अश्विनी भिडे, एमडी , मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड