महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीबीएस सिंड्रोम आजाराचा नागपुरात पहिला बळी; 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, दोन रुग्णांवर उपचार सुरू - GBS PATIENT DIED IN NAGPUR

जीबीएस सिंड्रोम आजारानं नागपुरात एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते.

GBS Patient Died In Nagpur
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 9:05 AM IST

Updated : Feb 15, 2025, 12:39 PM IST

नागपूर :जीबीएस सिंड्रोम आजाराने नागपुरात एक बळी घेतला आहे. शुक्रवारी रात्री रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुइलेनबॅरे सिंड्रोममुळे एका 45 वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील पारडी शिवारात राहणाऱ्या एका व्यक्तीला 11 फेब्रुवारी रोजी आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी ढासळली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

पारडी परिसरातील रुग्णाचा जीबीएस सिंड्रोम आजारानं मृत्यू :पारडी परिसरातील एका 45 वर्षीय व्यक्तीला जीबीएस सिंड्रोम आजारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 11 फेब्रुवारीला दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार सुरू केले. मात्र या रुग्णाला अगोदरचं दोन्ही हात आणि पायाला अर्धांगवायू झाला होता. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. शिवाय बीपीचा त्रास असल्यानं त्यांची प्रकृती नाजूक होती. या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यासह त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यातच त्यांची जीबीएस सिंड्रोम आजाराची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यातच शुकवारी सायंकाळी या रुग्णाची प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आलं. मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

आणखी दोन रुग्णांवर उपचार सुरू :नागपूरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जीबीएस सिंड्रोम आजाराच्या आणखी दोन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. या दोन रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. मात्र नागपुरात जीबीएस सिंड्रोम आजारानं रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा पहिला मृत्यू, ८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू
  2. मुंबईत जीबीएस रुग्णाचा पहिला मृत्यू, राज्यातील मृतांची संख्या 8वर पोहोचली!
  3. पुण्यात 'जीबीएस' रुग्णांच्या संख्येत घट; तरीही डॉक्टरांनी नागरिकांना केलं 'हे' आवाहन
Last Updated : Feb 15, 2025, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details