महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लालबागमध्ये सिलिंडरच्या स्फोटानं आग, चारजण जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक - Mumbai Lalbaug Fire - MUMBAI LALBAUG FIRE

Mumbai Lalbaug Fire : मुंबई येथील लालबाग परिसरातील रहिवासी असलेल्या इमारतीला आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चारजण होरपळल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Fire Breaks Out in Mumbai
इमारतीला आग (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 5:18 PM IST

मुंबई Mumbai Lalbaug Fire :मुंबईतील लालबाग परिसरात आज पहाटे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत (Fire News) चारजण होरपळून गंभीर जखमी (Four People Injured) झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती सध्या स्थिर असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती, पालिकेनं दिलीय. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालबाग (Lalbaug Mumbai) येथील मेघवाडी भागात पहाटे 5 वाजता ही आग लागली.

लालबाग येथे एका इमारतीला आग (ETV BHARAT Reporter)

सिलिंडरचा झाला स्फोट :मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग येथील डॉक्टर एस. एस. राव रोडवर असलेल्या मेघवाडी बिल्डिंग क्रमांक तीनमधील एका घरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक घरगुती वापराच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले. यातील दोन जखमींना कस्तुरबा रुग्णालयात तर दोघांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटानंतर घरातील आग आटोक्यात आली असली तरी, घरातील सर्व महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.



एकाची प्रकृती चिंताजनक : पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदर तीन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या 26 क्रमांकाच्या खोलीत आग लागल्याचं दिसलं. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत चारजण जखमी झाले असून, कुंदा मिलिंद राणे (48), अथर्व मिलिंद राणे (10), वैष्णवी मिलिंद राणे (10) आणि अनिकेत विलास डिकवलकर (27) अशी जखमींची नावं आहेत. यातील अनिकेत विलास डिकवलकर (27) या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. दादर येथील चित्रा सिनेमागृहाच्या कॅन्टीनला आग, जीवितहानी नाही - Fire To Canteen Of Chitra Cinema
  2. मुंबईत कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग; वृद्धाचा मृत्यू, 3 जखमी - Fire Breaks Out in Borivali
  3. भीषण आगीत दोन दुकान जळून खाक; संगमेश्वर बाजारपेठेतील घटनेनं नागरिकांना हादरा - Fire In Sangameshwar Market

ABOUT THE AUTHOR

...view details