महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग; वृद्धाचा मृत्यू, 3 जखमी - Fire Breaks Out in Borivali - FIRE BREAKS OUT IN BORIVALI

Fire Breaks Out in Borivali : बोरिवली येथील कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग (Fire News) लागली आहे. यात एकाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. आगीमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Fire Breaks Out in Borivali
टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 6:25 PM IST

Updated : Jul 25, 2024, 7:51 PM IST

मुंबई Fire Breaks Out in Borivali : मुंबईतील बोरिवली पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील कनकिया समर्पण टॉवरच्या (Kanakia Samarpan Tower) सहाव्या मजल्यावर अचानक भीषण आग (Borivali Fire News) लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने इमारतीत पोहोचले आणि आग विझवण्याचं काम केलं. आगीची घटना साडेचारच्या सुमारास घडली. आग कशामुळं लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग (ETV Bharat Reporter)

आगीत एकाचा मृत्यू : मुंबईतील बोरिवली भागातील कनकिया समर्पण टॉवरला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग नेमकी कशामुळं लागली? :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली येथील कनकिया समर्पण टॉवरमध्ये आज दुपारी 12:37 मिनिटांनी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवळपास एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत एक जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, तर तीन जण जखमी झाले. आग नेमकी कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

जखमींची नावे :महेंद्र शाह असे आगीत गुदमरून मृ्त्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, रंजना राजपूत, शिवानी राजपूत आणि शोभा सावळे अशी जखमींची नावे आहेत. आगीच्या घटनेनंतर जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Last Updated : Jul 25, 2024, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details