महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लसीच्या दुष्परिणामांना घाबरू नका; डॉ. भोंडवे यांची माहिती - Covishield Side Effects - COVISHIELD SIDE EFFECTS

Covishield Side Effects : कोरोना काळात देण्यात आलेल्या 'कोविशील्ड' लशीमुळं (Covishield Vaccines) अनेक रुग्णांना हृदयविकार अथवा ब्रेन स्ट्रोक या आजारांना सामोरे जावं लागत आहे. यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र, जेव्हा ही लस देण्यात आली तेव्हा केवळ एक टक्का लोकांना त्याचे काही दुष्परिणाम जाणवले होते. परंतु, हे दुष्परिणाम दीर्घकाळ जाणवत नाहीत. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं मत डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलंय.

Covishield Side Effects
कोरोना लस (Maharashtra Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:30 PM IST

प्रतिक्रिया देताना डॉ. अविनाश भोंडवे (Reporter Suresh Thamake)

मुंबई Covishield Side Effects : कोरोना कालावधीत देशभरात कोरोनापासून संरक्षणासाठी सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी तयार केलेल्या 'कोविशील्ड' (Covishield) आणि 'को वॅक्सिंन' (Covaxin) या लसींचा वापर करण्यात आला होता. देशभरात सुमारे 220 कोटी डोस नागरिकांनी घेतले होते. याची किंमत सुमारे 36 हजार कोटी रुपये इतकी आहे. तर महाराष्ट्रातही 17 कोटी 79 लाख 84 हजार नागरिकांनी डोस घेतले आहेत. यापैकी बहुतांश नागरिकांनी सिरम कंपनीची 'कोवीशील्ड लस' घेतली आहे.



कोविशील्ड लसीमुळं दुष्परिणामांची तक्रार: सध्या राज्यात 'कोविशील्ड' लसीमुळं अनेक नागरिकांना प्रकृतीच्या अन्य तक्रारी उद्भवल्या असल्याचं बोललं जातय. यासंदर्भात न्यायालयात याचिका ही दाखल करण्यात आलीय. काही नागरिकांच्या लसीमुळं हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक येऊन मृत्यू झाल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये या लसीबाबत घबराट निर्माण झाली असल्याचं सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांनी सांगितलंय.


सरकारी रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणात लसीचे वितरण: या संदर्भात बोलताना ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले की, ब्रिटनमध्ये तयार झालेले 'अस्ट्राझेनिक' हे औषध सिरम 'कोविशिल्ड' या नावाने भारतात विकत होते. सर्वात महत्वाचं म्हणजे हे व्हॅक्सीन जेव्हा दिले गेले तेव्हा ते सरकारी हॉस्पिटलमधून दिले गेले. काही थोड्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हे व्हॅक्सिन देण्याची परवानगी देण्यात आली होती. वॅक्सिंगमुळं रक्ताच्या गुठळ्या होणे आणि हृदयविकार किंवा ब्रेन स्ट्रोक होणे अशी तक्रारी समोर येत आहेत. तर या संदर्भातील जी काही आकडेवारी आहे ती सरकारी रुग्णालयातच मिळू शकते. कारण त्यांनीच हे औषध मोठ्या प्रमाणात दिलं होतं.


दुष्परिणामाचा केवळ एक टक्का प्रमाण : या वॅक्सिनमुळं जर काही दुष्परिणाम होत असतील तर त्याची एकूण टक्केवारी पाहिली असता ती, केवळ एक टक्का इतकी सुरुवातीच्या काळात दिसत होती. जेव्हा एखादं नवीन औषध किंवा वॅक्सिंन दिलं जातं आणि त्याच्या दुष्परिणामाची टक्केवारी एक टक्क्याच्या आसपास असेल तर त्याकडं फारसं चिंताजनक म्हणून पाहिलं जात नाही. यामुळं कोणते दोष निर्माण होत आहेत हे पाहून त्यानुसार त्यावर उपचार केले जातात. भारतामध्ये 'कोविशिल्ड' आणि 'को वैक्सीन' अशा दोन लसी देण्यात आल्या होत्या. या लसीचे भारतात सुमारे 175 कोटी डोस देण्यात आले होते. यापैकी पहिला डोस हा 2021 मध्ये तर तिसऱ्या बूस्टर डोसा 2023 मध्ये देण्यात आला होता. त्यामुळं काही अल्प प्रमाणात जर यातून दोष निर्माण झाले असतील तर आता दोन किंवा चार वर्षानंतर त्याच्याबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही. अशा व्हॅक्सिन्समुळं जेव्हा दुष्परिणाम निर्माण होतात ते लस घेतल्या घेतल्या किंवा सहा आठवड्यापर्यंत जाणवतात. त्यानंतर या लसीमुळं दुष्परिणाम होताना दिसत नाहीत, असंही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळं आता त्याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही असंही डॉक्टर भोंडवे यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा -

  1. कोविशील्ड साइड इफेक्ट्स: नागरिकांना लस नुकसान भरपाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Covishield Side Effects Plea
  2. कोरोना लसीमुळे दुष्परिणाम म्हणून 'हा' गंभीर विकार होतो, वैद्यकीय तज्ज्ञांची धक्कादायक माहिती - COVID vaccine side effects
  3. Praniti Shinde : कोविड लसीबाबत आमदार प्रणिती शिंदेंचा अजब दावा; म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details