मुंबईPolice recruitment postponed :पावसामुळं काही ठीकाणी पोलीस भरतीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळं काही ठीकाणी पोलीस भरती प्रक्रिया पुढं ढकल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. राज्यातील विविध जिल्ह्यात 17 हजार 441 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अनेक ठिकाणी पावसामुळं मैदानी चाचण्या पुढं ढकलण्यात आली आहे. तसंच पुढं ढकलण्यात आलेल्या मैदानी चाचण्या लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter) काय म्हणाले फडणवीस : "राज्यात पाऊस पडतोय. त्यामुळं काही ठीकाणी मैदानी चाचण्या घेणं शक्य नाहीय. तसंच राज्यात पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढे विधानसभा निवडणुका येत आहे. त्यामुळं राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळं मैदानी चाचण्या लवकर घेण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. कारण मैदानी चाचण्या पुढं ढकल्यासं अनेक मुलांच्या वयाचा प्रश्न निर्माण होतो. त्याचं भरतीचं वय संपल्यामुळं त्यांना कायमचं भरतीला मुकावं लागतंय. त्यामुळं ज्या ठिकाणी पाऊस नाही, अशा ठिकाणी चाचण्या सुरू आहे. अनेक ठिकाणी भरतीसाठी आलेली मुलं रोडवर झोपलेली पहायाला मिळत आहे. त्यांची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत".
मैदानी चाचणी पुढं ढकलली : नांदेड पोलीस दलातील भरती प्रक्रिया 19 जून रोजी सुरू झाली होती. 134 जागांसाठी 15 हजार 200 अर्ज प्राप्त झाले आहे. मैदानी चाचणी आज होणार होती, मात्र पावसामुळं ती पुढं ढकलण्यात आली आहे. या बाबतची सर्व माहिती नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
भरतीसाठी लाखो उमेदवार : राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बँड्समनच्या 41, कारागृह विभागात कॉन्स्टेबलच्या 1 हजार 686, ड्रायव्हरच्या 1 हजार 686, पोलीस हवालदाराच्या 9 हजार 595, शीघ्र कृती दलाच्या 4 हजार 349 पदांसाठी उमेदवारांनी भरतीची तयारी केली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं भरती प्रक्रिया पुढं ढकलावी लागत आहे.
'हे' वाचलंत का :
- 'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper
- लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha
- सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime