ठाणे Shivajirao Jondhale News : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे चेअरमन, दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणं आवश्यक होते. मात्र, शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी) आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांना वेळोवेळी त्रास दिल्याचा आरोप सागर जोंधळे यांनी केला. तसेच शिवाजीरावर यांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवून त्यांची हत्या केल्याचा दावा सागर जाेंधळे यांनी केलाय.
वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हा दाखल - Shivajirao Jondhale Death - SHIVAJIRAO JONDHALE DEATH
Shivajirao Jondhale News : वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे चेअरमन शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी केलाय. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Published : Aug 18, 2024, 9:07 PM IST
गुन्ह्याचा तपास सुरू-या गंभीर आरोपानंतर विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी), वर्षा देशमुख (शिवाजीराव यांची मुलगी), प्रितम देशमुख (जावई), हर्षकुमार खरे (मुलगा), स्नेहा खरे (सून) यांच्या विरुद्ध शनिवारी (17 ऑगस्ट) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मानसिक छळ करणे, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्याय संहिता कलमानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पवार यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पथकानं सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.