महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हे सरकार शब्द देणार अन् शब्द पाळणारं आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

Chief Minister Eknath Shinde : विधिमंडळाच्या अंतरीम अर्थसंकल्प आदिवेशनचा आजचा शेवटचा दिवस होता. यानंतर विरोधकांनी सत्तधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर, दुसरीकडे राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शब्द देणारं आणि शब्द पाळणारं आपल सरकार असलल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एनाथ शिंदे
मुख्यमंत्री एनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 10:44 PM IST

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " विरोधीक्षाकडं आत्मविश्वास दिसून आला नाही. विरोधीपक्षानं सरकारच्या चांगल्या कामाची स्तुती केली पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेला पूरक हा अर्थसंकल्प आहे. अनेकजण मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून देव पाण्यात ठेवले होते. मात्र, मराठा आरक्षण मिळाल. आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " कायद्याच्या चौकटीत बसेल असे निर्णय सभागृहात एकमताने घेतले. बाहेर जाऊन टिकणार नाही, असं सांगतायत. जेव्हा द्यायची संधी होती, तेव्हा हात अखडता घेतला. मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. समाजाला वंचित का ठेवायचं, असा विचार करत आम्ही सुप्रीम कोर्टात टिकेल, असं आरक्षण दिले आहे, असा दावाही शिंदे यांनी यावेळी केलाय. याबाबत अध्यादेश काढला असून त्याचा फायदा पोलीस आणि शिक्षक भरतीत मराठा समाज बांधवांना होणार असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.

सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील (दि. 1 नोव्हेंबर 2005)रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली आहे. शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के इतकं निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता, वाढ तसंच निवृत्ती वेतनाच्या 60 टक्के इतके कुटूंब निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पुढील दौऱ्यात शक्य होईल : मुख्यमंत्री म्हणाले की, " महिलांना आता जास्त संधी द्यायची आहे. पन्नास टक्के आरक्षण करायचं आहे. यामुळे वाॅर्ड जास्त करण्यात आले आहेत." बारामती दौऱ्यावर शरद पवार यांच्या जेवणच्या निमंत्रणावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "बारामती दौरा अतिशय व्यस्त आहे. त्यामुळं या दौऱ्यातर जेवणासाठी जाणं शक्य नाही. पुढील दौऱ्यात शक्य होईल," असं आपण कळवल्याचं त्यांनी सांगितलं.

अदिती तटकरे भाषणा करताना डोळ्यात पाणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचा कार्यकाळ पुढील अधिवेशच्या पहिले संपत आहे. त्यामुळे त्यांना आज निरोप देण्यात आला. त्यामुळे त्यांना आज विधान परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आमदार अनिकेत तटकरे यांची बहीण मंत्री अदिती तटकरे यांना भाषणा करताना डोळ्यात पाणी आलं होतं.

हेही वाचा :

1"राज्यातील गॅंगवॉर आता विधानभवनापर्यंत", भुसे-थोरवे धक्काबुक्की प्रकरणावरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल

2धक्कादायक! सुसाईड नोट लिहून रेल्वे होमगार्डची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

3"फुटलेल्या पक्षांनी आधी आपली ताकद तपासावी", महाविकास आघाडीतील जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर संतापले!

ABOUT THE AUTHOR

...view details