अमरावतीZero Shadow Day:अमरावती शहरात आज दुपारी बारा वाजून 14 मिनिटानंतर चिमुकल्यांनी शून्य सावली अनुभवली. महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या वतीनं अमरावती शहरातील भीम टेकडी परिसरात शून्य सावली दिनानिमित्त चिमुकल्यांसाठी खास मार्गदर्शन तसंच शून्य सावलीच्या अनुभवासाठी विशेष आयोजन करण्यात आलं.
वर्षातून दोन वेळा शून्य दिवस :23.50° च्या पट्ट्यामध्ये जगात काही ठिकाणी शून्य सावली वर्षातून दोन वेळा शून्य दिवस अनुभवता येते, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण गुल्हाने यांनी ई'टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. भारतात दिल्लीसह उत्तरेकडील शहर तसंच दक्षिणेकडील भागात असा अनुभव कधीही घेता येत नाही. सूर्याचा उत्तर तसंच दक्षिणायन असा मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडं असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. तेव्हा शून्य सावली दिवस अनुभवता योतो. आज अमरावतीत शून्य सावली दिवस चिमुकल्यांना अनुभवता आला. असाच शून्य सावली दिवस जूनमध्ये देखील अनुभवता येणार आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्यास या दिवसाचा अनुभव घेता येणार नाही, असं प्रवीण गुल्हानं म्हणाले.