महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट; चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कारवाई - Child Marriage In Chandrapur - CHILD MARRIAGE IN CHANDRAPUR

Child Marriage In Chandrapur : चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीनं चंद्रपूर जिल्ह्यातील दोन बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. आतापर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईननं 5 बालविवाह रोखले आहेत.

Child Marriages
बालविवाह (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 2:16 PM IST

चंद्रपूर Child Marriage In Chandrapur:चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या जिवती तालुका परिसरातील गावांमध्ये पालकांच्या समुपदेशानं एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आलं आहे. यंत्रणेमार्फत यावर्षी ५ बालविवाह थांबवण्यात आले आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई :गावामध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या १०९८ क्रमांकावर मिळाली. त्यानंतर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. दोन्ही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहायक संरक्षण अधिकारी परवीन शेख, अंगणवाडी सेविका आणि सुवरवायजर यांच्या मदतीनं प्राप्त करण्यात आला. चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले. ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीनं बालविवाह थांबवण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबीयांकडून बालविवाह करणार नसल्याचं शपथपत्र लिहून घेतलं. या संपूर्ण कारवाई दरम्यान जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे, किरण बोहरा, चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे यांनी बालविवाह थांबवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

बालविवाह करणाऱ्यांवर कशी होते कारवाई: गावागांवमध्ये बालसंरक्षण समिती नेमण्यात आली आहे. या माध्यमातून बालविवाह होत असल्यास त्याची माहिती या विभागाला मिळते. त्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीनं अत्यंत गोपनीय पद्धतीनं मुलांच्या वयाची पडताळणी केली जाते. बालविवाह असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात येते. लग्न होण्यापूर्वीच त्यावर कारवाई करण्यात येते. तसेच वधू आणि वराचे समुपदेशन केलं जाते. पालकांकडून मुलं वयस्क होण्यापूर्वी लग्न लावून देणार नाही, असं बालकल्याण समितीसमोर लिहून द्यावं लागते.

लग्न झाल्यास होणारी कारवाई : लग्नविधी पूर्ण झाली असल्यास केवळ पालकांवरच नाही, तर लग्नपत्रिका छापणारा मुद्रक, पुरोहित, फोटोग्राफर, बिछायत केंद्र संचालक, सरपंच, यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो.

येथे करा तक्रार:बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच १०९८ या चाईल्ड हेल्पलाइनवर संपर्क करा. कॉल करणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येते.

हेही वाचा

  1. 29 वर्षीय तरुणाचं 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न; मुलगी चार महिन्याची गरोदर
  2. बालविवाह रोखण्याबाबत काय केले, सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details