अमरावती Tribal Struggle For Water:प्रातःविधीपासून सकाळचा चहा, स्वयंपाक, धुणी-भांडी तसंच तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पावसाळ्यात देखील गावकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचं चित्र आहे. गावापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करत महिलांसह लहान मुलं, माणसांची विहिरीवर पाण्यासाठी गर्दी होतोय. त्यामुळं पाय घसरून विहिरीत पडण्याचा धोका देखील निर्माण झालाय. देशात स्वातंत्र्याची 77 वर्ष उलटल्यानंतर देखील आमच्या माऊल्यांना पाण्यासाठी वनवन भटकत फिरावं लागत असल्याचं चित्र मेळघाटात पहायलपा मिळतंय. मात्र, याची जाणीव राजकीय नेते, सामाजीक संघटना, तसंच सुक्षशीत समाजाला नसल्याची खंत आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे.
आदिवासींना पाणीटंचाईचा फटका :उन्हाळ्यात पाणीटंचाई देशभरात अनेक ठिकाणी पहायला मिळते, मात्र उन्हाळाच नव्हे, तर हिवाळा, पावसाळ्यात देखील अनेकांना पाण्याची समस्या भेडसावतेय. मेळघाटातील आदिवासींच्या अनेक पिढ्यांना या पाणी टंचाईचा फटका बसतोय. धारणी तालुक्यात येणाऱ्या चौराकुंड या अतिदुर्गम भागात पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या असाह्य वेदना, अडचणी समस्या 'ईटीव्ही भारत' नं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. गावातील महिला, युवती इतकच नव्हे, तर लहान मुलांना देखील पाण्यासाठी धावपळ करावी लागतेय. खरंतर या भागात पाणीटंचाईच्या झळा वर्षानुवर्षे तशाच आहेत.
स्वातंत्र्यानंतरही पाण्यासाठी संघर्ष :परतवाडा ते धारणी मार्गावर हरीसाल गावापासून उजव्या बाजूला जंगलात 11 किलोमीटर आतमध्ये 1 हजार वस्तीचं चौराकुंड गाव आहे. या गावात पहाटे दिवस उजाडताच प्रत्येक घरातील महिला, लहान मुलं, वृद्धाची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जांगरू बेठेकर यांच्या शेतातील विहिरीवर सर्वच गावकऱ्याची पाण्यासाठी जत्रा भरते. विहरीतून हातानं पाणी काढल्यानंतर गावात पोहचवण्यासाठी सर्वांचा अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यानंतर एका दिवसाचं पाणी प्रत्येकाच्या घरी साठतं. तसंच ज्यांच्याकडं दुचाकी, बैलगाडीती साधन आहेत त्यांना पाण्याची वाहतूक करणं सोप जातं. मात्र, ज्यांच्याकडं वाहतूकीची साधनं नाहीत, अशांना अनेक तासांची पायपीट करावी लागते. त्यामुळं आयुष्यभर जावाशी खेळून मेळघाटातील आदिवासांना घोटभर पाणी मिळंत.
ग्रामस्थांचा शासन, प्रशासनावर रोष : गावात नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळं प्रत्येक घरात नळ येतील, असं पोकळ अश्वासनं नेहमीच राजकीय नेते देतात. मात्र वास्तवात गावात कुठेच पाईपलाईन दिसंत नाहीय. एक, दोन ठिकाणी नावापुरते नळ बसवण्यात आले आहेत. शासन, प्रशासनातील मंडळी केवळ आमची फसवणूक करीत असल्याचा रोष चौराकुंड येथील ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलाय. आमचं गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत. त्यामुळं या भागात अनेक कामांना अडचणी येत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तरी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहायला हवं, अशी अपेक्षा चौराकुंड येथील रहिवासी सुरेश सावलकर या युवकानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलीय.