शिर्डी Chandrababu Naidu in Shirdi : तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष तथा आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज महाराष्ट्र भेटीत शिर्डीतील साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आजच सकाळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचंही दर्शन घेतलं होतं.
चंद्राबाबू आल्याचं कळताच चाहत्यांची गर्दी : आज दुपारी चंद्राबाबू नायडू खास विमानानं कोल्हापूरहून शिर्डी विमानतळवर पोहोचले. तिथून त्यांचा ताफा थेट साईमंदिराच्या गेट नंबर दोनवर पोहचला. नायडू साई बाबंच्या दर्शनाला येणार असल्याचं समजताच आंध्र प्रदेशच्या साई भक्तांनी चंद्राबाबूंना पाहण्यासाठी गर्दी केली. चंद्राबाबू नायडू यांनी साईंच्या समाधी मंदिरात जात दर्शन घेतलं. तसंच सपत्नीक साईंची पाद्यपूजाही केली. यादरम्यान मंदिरातून साईदर्शन करुन बाहेर आलेल्या भाविकांना चंद्राबाबू आल्याचं कळताच चंद्राबाबूंच्या चाहत्यांनी आवाज त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती. साईमंदिरातून बाहेर निघताना चाहत्यांनी सीएम सीएम, नेक्स्ट सीएम तसंच सीबीएन अशा घोषणा दिल्या. यानंतर चाहत्यांचं प्रेम पाहून नायडूंनीही सर्वांना नमस्कार करत गाडीच्या दारात उभे राहात अभिवादन केलं.
मंदिर प्रशासनाकडून चंद्रबाबू नायडूंचा सत्कार : साई मंदिरात दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई मूर्ती तसंच शॉल देवून चंद्राबाबू नायडूंचा सहपत्नीक सत्कार केला.