महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘तिला आतमध्ये घ्या’ म्हणत पुण्यातील पोलीस ठाण्यात महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलीस उपनिरीक्षकासह 8 जणांवर गुन्हा - Third degree to woman - THIRD DEGREE TO WOMAN

Third Degree to Woman : पुण्यामध्ये पोलिसांनी एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार केलाय. एका महिलेला थर्ड डिग्री दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस कर्मचारी तसंच अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण वाचा....

Samarth police station in Pune
समर्थ पोलीस ठाणे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 9:10 PM IST

पुणे Third Degree to Woman : पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी एका महिलेला थर्ड डिग्री दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी महिलेला बेदम मारहाण केल्यानं ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. ही घटना 23 मार्च 2023 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्यात घडली होती.

मला समर्थ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मला जबरदस्ती बोलवून माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. मी दिलेली तक्रार मागं घेण्यासाठी माझ्यावर पोलिसांनी दबाव टाकला. त्यानंतर मला त्यांनी धमकी दिली. मी तक्रार मागे न घेतल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली - पीडित महिला

पोलिसांवर गुन्हा दाखल : याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेनं समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर (50), महिला पोलीस हवालदार निलम कर्पे, माया तुकाराम गाडेकर, योगिता भानुदास आफळे, एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखी पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे (रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (रा. साततोटी गणेश मंडळ, कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

‘तिला आतमध्ये घ्या’ : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ (नाव बदलेलं आहे) हा तक्रारदार महिलेचा पती आहे. महिलेनं पतीच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरुन आरोपी पतीच्या मित्रांनी तक्रारदाराला शिवीगाळ करुन धमकी दिली होती. त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं या तक्रारदार महिलेला चौकशीसाठी समर्थ पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यावेळी पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘तिला आतमध्ये घ्या’ असं सांगितलं. त्यानंतर महिला पोलीस हवालदार माया गाडेकर, योगिता आफळे तसंच इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला पोलीस ठाण्यातील एका खोलीत घेऊन गेले. तिथं या महिलेचं काहीही न ऐकता पोलिसांनी तिला कंबरेच्या पट्ट्यानं, लाथा बुक्क्या मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली. या घटनेबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करत आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तत्काळ मुक्तता करावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका - Porsche Car Accident Case
  2. शिंदे-फडणवीस-पवारांनी पाहणी दौऱ्यात वापरलेल्या रॉल्स रॉईसवर होता चक्क ट्रकचा नंबर, वाचा काय आहे ही भानगड - Rolls Royce number
  3. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire

ABOUT THE AUTHOR

...view details