पुणेBoostMyChild app : बालकांच्या सर्वांगीण विकासाला 'बूस्टमायचाईल्ड'ची साथ मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून पालक, शिक्षकांसाठी 'ॲप'ची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच बूस्टमायचाईल्ड'ला लोकाभिमुख करण्यासाठी वर्धन ग्रुपच्या वतीनं एक कोटी रुपयांची गुंतवणूक (प्री-सीड फंडिंग) करण्यात आली आहे, अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर आणि 'बूस्टमाईचाइल्ड'चे संस्थापक विपुल जोशी यांनी आज दिली.
ॲपच्या माध्यमातून दोन कोटींची उलाढाल :सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या विपुल जोशी यांनी कॅलिफोर्नियात (यूएसए) मास्टर ऑफ सायन्स (एमएस) पूर्ण केल्यानंतर 'बूस्टमायचाइल्ड' नावाच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली. सखोल संशोधन, नवकल्पना वापरून चार वर्षांत त्यांनी या विकसित 'बूस्टमायचाइल्ड'ची निर्मिती केली. त्यामुळं त्यांना भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनुदान मिळालं. तसंच 'इनोव्हेशन इन अर्ली इयर्स एज्युकेशन' पुरस्कारही मिळाला. येत्या काळात या ॲपच्या माध्यमातून दोन कोटींची उलाढाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2 हजाराहून अधिक वापरकर्ते हे ॲप वापरत आहेत. विविध खासगी, सरकारी शाळांमध्ये या ॲपचा वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बाल मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ञ, बालशिक्षणातील तज्ञ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञांनी चार वर्षांच्या एकत्रित संशोधनानंतर हा प्लॅटफॉर्म तयार केलाय. नवीन शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम, बालपणाची काळजी या अनुषंगानं हे ॲप मार्गदर्शक ठरत आहे.- विपुल जोशी, सॉफ्टवेअर अभियंता