शिर्डीMP Sanjay Raut :ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज (दि. 2) शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. जागा वाटपाचे सर्व निर्णय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या जागांवर निर्णय घेऊ, असं राऊत यांनी म्हटलंय. तसंच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. आंबेडकरांसह शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिर्डीची जागा शिवसेना लढवणार : शिवसेना शिर्डीची जागा लढवणार आहे. या जागेवर शिवसेना सातत्यानं विजयी होत आहे. आमच्या पक्षानंही येथे प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक पक्ष चर्चेत असणाऱ्या जागा मागत आहे. कार्यकर्ते आग्रह करतात, पण पुढं जावं लागतं. भाजपानं आमच्यासोबत युती तोडून विश्वासघात केलाय. 2014 मध्ये युती कोणी तोडली? त्यानंतर मातोश्रीचं निमंत्रण घेऊन कोण आलं असा सवाल राऊत यांनी केला. काल निधीवरून एका मंत्र्याला मारहाण झाली. सुदैवानं 'ती' वेळ येथील पालकमंत्र्यांवर आली नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.