आमदार भास्कर जाधव हे निलेश राणेंवर टीका करताना रत्नागिरीBhaskar Jadhav :पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर हा संघर्ष टळला असता असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. काल राणे समर्थक आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा राडा झाला. यामध्ये 30 ते 40 जण जखमी देखील झाले. तर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. याबाबत पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 300 ते 400 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
''निलेश राणे यांची सभा गुहागरमध्ये होती. मग माझ्या ऑफिससमोरून रॅली का? पोलिसांनी रॅलीला परवानगी कशी दिली? गुहागरमध्ये सभा असताना निलेश राणे मुद्दामहून 60 किलोमीटर वळसा मारून चिपळूणला आले. त्यांना हे घडवायचं होतं. राज्य सरकार यामागे आहे.'' -- भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट (शिवसेना)
जाधवांचे भाजपाला प्रश्न:''गृह खात्याला हा राडा घडवायचा होता की काय?'' असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. दरम्यान, ''निलेश राणेंनी जाहीर व्यासपीठावरून मला मारण्याची धमकी दिली आहे. हे व्यासपीठ भाजपाचं होतं. म्हणजे भाजपालासुद्धा माझा काटा काढायचा आहे का? विरोधक म्हणून भाजपाला मला संपवायचं आहे का? राणे यांनी काल पद्धतीनं खालच्या दर्जाचं भाषण केलं. भाजपाला ही संस्कृती आता मान्य आहे का?'' असे प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.
- मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा:''वाय दर्जाची सुरक्षा घेऊन काही लोक महाराष्ट्रात दंगा घडवू पाहत आहेत. निलेश राणे समर्थकांकडून पहिल्यांदा दगडफेक झाली. आम्हीसुद्धा दगडफेक केली हे आम्ही मान्य करतो. काहीही झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार'' असल्याचं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यावेळी म्हणाले. 'घटनेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. स्वतःला सांभाळा, पोलीस स्थानकात तक्रार द्या, पोलीस यंत्रणा कितपत मदत करेल याबद्दल शंका व्यक्त केली. पण आपण कायदा पाळून पुढे जाऊया'', असं उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
म्हणून माझा काटा काढण्याचा प्रयत्न:''भाजपाच्या विरोधात लढतोय म्हणून माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे'', असा आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला. ''कालच्या निलेश राणे यांच्या गुहागरच्या सभेसंदर्भात माझ्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरकार तुमचं आहे. वेळणेश्वर येथील सीआरझेड संदर्भातील घराची चौकशी करा. तसेच विनय नातू यांनी माझा पराभव केला तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन'', असंदेखील भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
हेही वाचा:
- नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया
- ज्ञानपीठाच्या निवडीत यंदा उर्दूसह संस्कृतचा मिलाफ, उर्दू कवी गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना पुरस्कार जाहीर
- 'ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला, देशात कधी असं घडलं नाही'; शरद पवार