महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मोठा आरोप; म्हणाले ".... यांनी मला सीआयडी कार्यालयात चुकीची वागणूक दिली" - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करण्यात होती. त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case Pune Morcha
संतोष देशमुख खून प्रकरणी पुण्यात मोर्चा (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 6:22 PM IST

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी, सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तसंच विविध पक्षाचे राजकीय नेते, देशमुख कुटुंबाचे सदस्य देखील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.

सीआयडी कार्यालयात चुकीची वागणूक दिली : "आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आज आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत. जे काही झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. तसेच मी जेव्हा सीआयडी कार्यालयात गेलो होतो, तेव्हा मला बालाजी तांदळे यांच्याकडून चुकीची वागणूक देण्यात आली. अर्वाच्च भाषेत माझ्याशी बोललं गेलं" अशी धक्कादायक माहिती, धनंजय देशमुख यांनी दिली.

सकल मराठा समाजाकडून मोर्चा (ETV Bharat Reporter)

"माझी एवढीच मागणी आहे की, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही येथे न्याय मागण्यासाठी आलो असून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तसेच जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी कोणी आरोपींना आश्रय दिलं आहे, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला पाहिजे". - वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी

मारेकऱ्यांना फाशी व्हायला पाहिजे: खासदार बजरंग सोनवणे हे देखील आज मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच वाल्मीक कराडला देखील खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी केलं पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा, मनोज जरांगेंसह राजकीय नेते होणार सहभागी
  2. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी; रोहित पवारांची मागणी
  3. संतोष देशमुख हत्याकांड; 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details