महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक बातमी; चुलतीने केली आत्महत्या, काही तासातच पुतण्यानं संपवलं जीवन

Suicide in Pune : शिरुर तालुक्यात चुलतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर काही तासात पुतण्यानं देखील आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Suicide in Pune
चुलती आणि पुतण्याने केली आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 11:56 AM IST

पुणे Suicide in Pune : पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात चुलती आणि पुतण्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडलीय. या घटनेनं शिरुर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कल्पना रवींद्र शिंदे (वय ३१) आणि सचिन दौलत शिंदे (वय २४, रा. दोघेही, गणेगाव दुमाला, ता. शिरुर जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे (दोघेही रा. गणेगाव दुमाला, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


चुलती आणि पुतण्यानं केली आत्महत्या: शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संगमेश्वरवस्ती परिसरात कल्पना रवींद्र शिंदे तसेच सचिन शिंदे कुटुंबीयांसह राहत होते. रविवारी (दि ४) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना कल्पना शिंदे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे (वय २४) यानेही आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट : याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे आणि गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक संपत खबाले आणि पोलीस नाईक अमोल गवळी करत आहेत.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न : याआधीही पुण्यात तुकाईनगर येथे अशीच एक घटना घडली होती. कॅनॉलमध्ये एका महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न ( Attempted suicide by jumping into canal ) केला होता. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तरीही या महिलेने पाण्यात उडी मारली होती. त्यानंतर पोलीस हवालदार काशीद यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर काढलं होतं.

हेही वाचा -

  1. घाटकोपरमध्ये खळबळ! सासू आणि पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने केली आत्महत्या
  2. पालकांनो मुलांना जपा, १९ वर्षीय मुलीनं तणावातून केली आत्महत्या
  3. वर्ध्यात बेपत्ता असणाऱ्या प्रमीयुगुलाची आत्महत्या, परिसरात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details