महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घातपात करण्याचा महाविकास आघाडीचा होता डाव" - Eknath Shinde group

Raju Waghmare on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घातापात करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय.

राजू वाघमारे
राजू वाघमारे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 4:30 PM IST

Updated : Apr 23, 2024, 4:53 PM IST

मुंबई Raju Waghmare on Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक गौप्यस्फोट केले. यानंतर आज नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले (शिंदे गट) प्रवक्ते राजू वाघमारेंनी मविआ सरकारवर गंभीर आरोप केले. मविआ सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा का दिली नाही?, असा सावाल उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे यांनी मागणी करुन देखील त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे यातून त्यांचा घातपात करण्याचा उद्धव ठाकरे डाव दिसत होता, असा आरोप वाघमारे यांनी केलाय. आज त्यांनी मुंबईतील बाळासाहेब भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

बंडाची सुरुवात खूप आधीपासून : शिवसेनेत झालेल्या बंडाची सुरुवात खूप आधीपासून झाली. त्यामुळं हे एकाच रात्रीत घडलेलं नाही. या बंडाला त्यावेळचं शिवसेनेचं नेतृत्व कारणीभूत होतं, असा आरोप डॉ. वाघमारे यांनी केला. तसंच यापुढं ठाकरे गटाबाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा डॉ. वाघमारे यांनी दिला. तत्कालीन नगरविकास मंत्री तसंच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली. याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवं, अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली. त्यामुळं उद्धव ठाकरेंना गद्दार का म्हणू नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग :उद्धव ठाकरे यांच्या मनात आता पंतप्रधान पदाची लालसा उफाळून आली आहे. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही बाजूला सारलं. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंची अवस्था 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग' अशी झाली आहे. तसंच नकली शिवसेनेचे 'मुंगेरीलाल' संजय राऊत आहेत, असा टोला डॉ. राजू वाघमारे यांनी लगावला.

हे वाचलंत का :

  1. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारची वाय प्लस सुरक्षा, विरोधकांची सरकारवर टीका - Parth Pawar Y Plus security
  2. अकोल्यात आज अमित शाह यांची सभा, काय आहेत लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे? - Akola Lok Sabha election 2024
  3. पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त विधानावरुन काँग्रेस आक्रमक; म्हणाले, "संविधानाला भाजपाचा..." - PM Narendra Modi
Last Updated : Apr 23, 2024, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details