नवी दिल्ली/मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर महायुतीचे नेते आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या एकत्रित फोटो हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपद आणि नवे सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा घेण्यात येणाऱ्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे यापूर्वी शिंदे यांनी जाहीर केले. मात्र, दिल्लीती बैठकीनंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर झालेला नाही. बैठकीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे हसरे चेहरे फोटोतून दिसून आले. दुसरीकडं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं देहबोलीतून दिसत होते.
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते मा. श्री. अमितभाई शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2024
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे पी नड्डा जी, शिवसेना पक्षप्रमुख श्री. एकनाथजी शिंदे,… pic.twitter.com/nmCZoYw6rQ
एकनाथ शिंदे यांच्या एक्स मीडियावरून महायुतीच्या बैठकीबाबत मौन- देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एक्स मीडियावरून बैठकीचे फोटो पोस्ट करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या एक्स मीडिया अकाउंटवर महायुतीच्या बैठकीबाबत कोणतीही पोस्ट करण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ मा. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले ! यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जेपी नड्डा जी, एकनाथ शिंदे जी, अजित दादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, सहकारी उपस्थित होते." अजित पवार यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते मा. श्री. अमितभाई शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले".
Expressed my gratitude to Hon Union Minister Shri Amitbhai Shah, for his huge support on the battlefield during the important Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 and for the way he greatly inspired and motivated the karykartas.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2024
On this occasion, our BJP National President JP… pic.twitter.com/KAd341ANtw
- बैठकीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीनंतर माध्यमांशी म्हणाले, " कधी हसरा आणि कधी गंभीर आहे, हे तुम्ही ठरवता. मी खूश आहे. ही बैठक चांगली सकारात्मक झाली. आणखी एक महायुतीची मुंबईत बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची भूमिका कोण घेणार? याचा निर्णय घेतला जाणार आहे".
दिल्ली | महाराष्ट्र के कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, " बैठक अच्छी और सकारात्मक रही। यह पहली बैठक थी। हमने अमित शाह और जे.पी. नड्डा से चर्चा की...महायुति की एक और बैठक होगी। इस बैठक में फैसला लिया जाएगा कि मुख्यमंत्री कौन होगा। बैठक मुंबई में होगी..." pic.twitter.com/U4JMHnm0Mt
— ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2024
एकट्या भाजपाकडं आहे बहुमत?- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 उमेदवार निवडून आल्यानं भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळं एकटा भाजपा बहुमताच्या अगदी जवळ आहे. भाजपानं मित्रपक्षांना दिलेले 9 उमेदवारही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचबरोबर पाच अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाचं एकूण संख्याबळ 146 असल्यानं भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, अशी स्थिती आहे. अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जास्तीत जास्त मंत्रिपदासाठी आणि ठराविक खात्यांसाठी फारसा आग्रह धरता येणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
हेही वाचा-