बेंगळुरु WPL Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामापूर्वी म्हणजेच 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या आधी, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. ज्यात सर्व 10 फ्रँचायझींनी भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. आता महिला प्रीमियर लीगचा तिसरा सीझन म्हणजेच WPL 2025 मध्ये खेळवला जाणार आहे, त्याआधी एक मिनी लिलाव आयोजित केला जाईल, ज्यात अनेक मोठ्या खेळाडूंच्या संघात बदल होतील असं मानलं जातं. महिला प्रीमियर लीगमध्ये सध्या एकूण 5 संघ खेळतात, ज्यात 18 खेळाडूंचा संघ आहे. दरम्यान, आता महिला खेळाडू लीगच्या मिनी लिलावाची तारीख समोर आली आहे.
WPL Auction 2025 To Be Held In Bengaluru On 15th Of December pic.twitter.com/yg8NYt6YU6
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) November 28, 2024
डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा लिलाव कधी होणार : ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार, महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी मिनी लिलाव बेंगळुरुमध्ये 15 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी प्रत्येक संघाला 15 कोटींची पर्स मिळणार आहे. ज्यात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची नावं लिलावापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. जर आपण मिनी लिलावाबद्दल बोललो तर, भारताच्या स्नेह राणा, पूनम यादव आणि वेदा कृष्णमूर्ती हे स्टार खेळाडूंमध्ये असतील. याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये ली ताहुहू, हीदर नाइट आणि डिआंड्रा डॉटिन यांचा समावेश आहे. सर्व 5 संघ त्यांच्या संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करु शकतात.
𝐌𝐚𝐫𝐤 𝐲𝐨𝐮𝐫 𝐜𝐚𝐥𝐞𝐧𝐝𝐚𝐫𝐬! 🗓
— Female Cricket (@imfemalecricket) November 28, 2024
🔹 The WPL 2025 mini auction is set for December 15 in Bengaluru! 🔥
🔹 INR 15 crore for each franchise 💰
🔹 Who’s going to be the top pick? 🤔#CricketTwitter #WPL2025 pic.twitter.com/zrzA5MHFXI
मिनी लिलावात सर्वाधिक पैसा गुजरात जायंट्सकडे : जर आपण डब्ल्यूपीएल मिनी लिलावामधील पाचही फ्रँचायझींच्या पर्सबद्दल बोललो, तर गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक 4.40 कोटी रुपये शिल्लक आहेत, ज्यात त्यांना फक्त 4 खेळाडू घ्यायचे आहेत आणि त्यापैकी 2 परदेशी खेळाडूंसाठी स्लॉट आहेत. यानंतर, सर्वात जास्त पैसा यूपी वॉरियर्स संघाकडे आहे, ज्यांना मिनी लिलावात त्यांच्या संघात फक्त 3 खेळाडूंचा समावेश करायचा आहे, त्यामुळं त्यांच्याकडे 3.90 कोटी रुपये शिल्लक आहेत. मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या महिला संघाकडे 2.65 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाकडे 2.5 कोटी रुपये, तर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या महिला संघाकडे 3.25 कोटी रुपयांची पर्स असेल.
Here's how the 5⃣ Teams stand ahead of the #TATAWPL Auction 🙌 pic.twitter.com/IVPttQnl0J
— Women's Premier League (WPL) (@wplt20) November 8, 2024
हेही वाचा :