ETV Bharat / politics

बांगलादेशी रोहिंग्यांचा अंजनगावशी संबंध नाही; किरीट सोमैया यांच्या आरोपावर तहसीलदारांचं स्पष्टीकरण - FAKE BIRTH CERTIFICATE SCAM

मालेगावनंतर आता अमरावतीमध्येही बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केला होता. याप्रकरणी तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमैया (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

अमरावती : मालेगाव प्रमाणेच अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी (Anjangaon Surji) येथे बांगलादेशी रोहिंग्यांना अकराशे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. असं असतानाच अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अंजनगाव सुर्जी तहसीलमधून कुठल्याही बांगलादेशी व्यक्तीला जन्म प्रमाणपत्र दिलं नाही, असं पुष्पा सोळंके यांनी स्पष्ट केलंय.

569 जणांना दिले जन्म प्रमाणपत्र : अंजनगाव सुर्जी तहसील अंतर्गत वर्षभरात 569 जणांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी 485 दाखले हे अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे मुस्लिम व्यक्तींना देण्यात आले असून 84 दाखले हे हिंदू व्यक्तींना देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 1000 च्या जवळपास अर्ज अद्याप पेंडिंग आहेत. हे अर्ज त्रुटीमध्ये असल्यामुळं त्यांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पुष्पा सोळंके यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना तहसीलदार पुष्पा सोळंके (ETV Bharat Reporter)

कुठलाही गैरप्रकार नाही : अंजनगाव सुर्जी येथील रहिवाशांना जन्म प्रमाणपत्र देताना आमच्याकडं रहिवासी दाखल्यासाठी प्राप्त अर्जांची रीतसर चौकशी केली जाते. एखादी व्यक्ती ग्रामीण भागातला असली तर त्या गावातील सरपंचाचा रहिवासी दाखला आम्ही मागतो. शहरातील व्यक्ती असेल तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याचा दाखला आम्ही घेतो. यासोबतच अर्जदाराच बयान वृत्तपत्रात प्रकाशित होणारा जाहीरनामा आणि 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतल्यावरच पडताळणी करून संबंधित व्यक्ती तालुक्यातील रहिवासी असल्या संदर्भातला आदेश पारित करतो. आपल्याकडं कुठल्याही प्रकारे गैरप्रकारे आदेश पारित करण्यात आले नाही असंदेखील पुष्पा सोळंके यांनी सांगितलं.

किरीट सोमैया यांचा आला होता फोन : अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून सुमारे अकराशे बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या संदर्भात किरीट सोमैया यांचा फोन आला होता. मालेगावप्रमाणे अंजनगावमध्ये असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं आपण त्यांनाही स्पष्टपणे सांगितल्याचंही पुष्पा सोळंके म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. किरीट सोमैयांविरोधात तक्रार द्यायला 5 महिला समोर आल्या, पण घाणेरडं राजकारण आम्ही करणार नाही - संजय राऊत
  2. किरीट सोमय्यांचा लेटर बॉम्ब : 'पुन्हा अपमानास्पद वागणूक देऊ नका', निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर काम करण्यास नकार
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : पोलीस कल्याण निधीच्या वादात निष्पापांचे बळी ? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Ghatkopar Hoarding Collapse

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.