मेलबर्न : ऑस्ट्रेलियन सिनेटनं गुरुवारी 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलंय. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच कायदा असेल. या कायद्यात अशी तरतूद आहे की जर 'टिकटॉक', 'फेसबुक', 'स्नॅपचॅट', 'रेडडिट', 'एक्स' आणि 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे खाते उघडण्यास/सोशल मिडियावर बंदी घालण्यात येणार आहे. तसंच असं एखाद्यानं केल्यास 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंत संबंधिताला दंड होऊ शकतो.
Australian Parliamente नं संमत केला कायदा : हे विधेयक सिनेटमध्ये 19 विरुद्ध 34 मतांनी मंजूर झालं. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हनं याला आधीच 13 विरुद्ध 102 मतांनी मंजूरी दिली आहे. तथापि, सिनेटमध्ये विरोधकांनी आणलेल्या दुरुस्त्यांना प्रतिनिधीगृहानं अद्याप मंजुरी दिलेली नाही. पण ती केवळ औपचारिकता आहे, कारण ती पास होणार असल्याचं सरकारनं आधीच मान्य केलं आहे. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडं या बंदीची अंमलबजावणी कशी करावी हे ठरवण्यासाठी एक वर्ष लागणार आहे.
मेटानं केला कायद्याला विरोध : फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं संचालन करणाऱ्या मेटा कंपनीनं या निर्णयाला विरोध केलाय. कंपनीनं याबाबत सांगितलं की, 'हा घाईगडबडीत केलेला कायदा आहे'. "मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातल्यानं वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम होईल. कारण त्यांना त्यांचं वय 16 वर्षांपेक्षा जास्त असल्याचं सिद्ध करावं लागेल", असं कायद्याच्या समीक्षकांनी म्हटलं आहे. ऑनलाइन सेफ्टी कॅम्पेन चालवणाऱ्या सोन्या रायन यांनी सिनेटमधून हे विधेयक मंजूर होणे हा मुलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचलंत का :