महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

100 जेट, हजारो NSG कमांडो तैनात; अनंत-राधिकाच्या शाही लग्नाची तयारी पूर्ण, 'या' शुभ मुहूर्तावर वरमाला विधी - Anant Radhika wedding - ANANT RADHIKA WEDDING

Anant Ambani and Radhika Merchant Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत विवाहबद्ध होत आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विवाह सोहळ्यासाठी 'अँटिलिया' निवास्थानाला वधूप्रमाणं सजवलं आलंय.

Anant Ambani and Radhika Merchant
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Social Media)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 9:18 PM IST

मुंबई Anant Ambani and Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलैला होत आहे. भारताबरोबरच परदेशातही या लग्नाची चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या विधींचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लग्नात खाण्यावरही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. जेवणाच्या मेनूमध्ये अनेक पदार्थांचा समावेश केला आहे, ज्यामध्ये यूपीच्या चाटचंही नाव आहे. अनंत अंबानींच्या लग्नात यूपीतील एका प्रसिद्ध दुकानातील चाट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलैला आहे, 13 जुलैला आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलैला रिसेप्शन होणार आहे.

'असा' असेल कार्यक्रम : 12 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत अंबानी कुटुंबीयांच्या घरी पाहूणे जमा होतील. यानंतर लग्नात आलेल्या पाहुण्यांना फेटा बांधण्याचा विधी पार पडणार आहे. तसंच त्याचदिवशी रात्री आठ वाजता वरमाला सोहळा होणार आहे. तर रात्री 9.30 वाजता विवाह सोहळा होणार आहे. लग्नासाठी पाहुण्यांचा ड्रेस कोड पारंपरिक ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.

लग्नात 'बनारसी चाट': अनंत अंबानींच्या लग्नात 'बनारसी चाट' दिलं जाणार आहे. ही प्रसिद्ध चाट बनारसमधील प्रसिद्ध दुकान 'काशी चाट भंडार'ची असेल. इथलेच लोक तिथं चाट सर्व्ह करतील, असं सांगण्यात येत आहे. हे तेच दुकान आहे, जिथं काही दिवसांपूर्वी नीता अंबानी गेल्या होत्या. बनारसमध्ये नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्यासोबतच काशी चाट भंडारलाही भेट दिली होती.

100 खासगी विमानं : अनंत अबानी यांच्या शाही लग्नासाठी देश, विदेशातून विशेष पाहुणे येत आहेत. या सर्व पाहण्यांसाठी 100 हून अधिक प्रायव्हेट जेट बुक करण्यात आली आहेत. तसंच हे जेट लँड झाल्यानंतर तिथून लग्न सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी लक्झरी कारही ठेवण्यात आल्या आहेत. लग्नाला येणारे पाहुणे हे व्हीव्हीआयपी कॅटेगरीमधील आहेत. त्यामुळं त्यांचा व्हीव्हीआयपीच पाहुणचार होत आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित : लग्नापूर्वी अंबानींच्या निवासस्थानी झालेल्या विशेष शिवशक्ति पूजा कार्यक्रमात कोकिलाबेन अंबानी, अनिल अंबानी, टीना अंबानी, अभिनेता संजय दत्त, शनाया कपूर, अनन्या पांडे सहभागी झाले. राजकारणातील विविध प्रमुख नेत्यांना देखील या शाही सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराला देखील उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळालं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन, टोनी ब्लेअर, अमेरिकेचे माजी विदेश मंत्री जॉन केरी, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यासहित विविध नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुरक्षिततेसाठी एनएसजी कमांडो तैनात : लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पाहुण्यांसाठी तब्बल 2 हजार 500 पदार्थ जेवणात असणार आहेत. 10 आंतरराष्ट्रीय शेफ जेवण बनवणार आहेत. पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कोट्यवधींची घड्याळं दिली जाणार आहेत. ISOS (Integrated Security Operating System) इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टिम लावण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसाठी 100 खासगी विमानं तयार ठेवण्यात आली आहेत. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्न होणार असून त्या ठिकाणी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

अनेक परदेशी कलाकारांचे परफॉर्मन्स :अलीकडेच हॉलिवूड सिंगर जस्टिन बीबरनंही अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमामध्ये परफॉर्म केलं. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा विवाहसोहळा जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होईल. त्यानंतर शनिवारी 'आशीर्वाद' हा मिनी रिसेप्शनचा कार्यक्रम नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये होईल. 14 जुलैला मुख्य रिसेप्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या शाही विवाह सोहळ्यात उद्योग, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील देशातील, परदेशातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोन, कॅटरिना कैफ, शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा, निक जोन्स, रणवीर कपूर, आलिया भट, अमीर खान यांच्यासहित बॉलिवूडच्या अनेक सिताऱ्यांना या लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. यापूर्वी 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग इव्हेंट गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. ज्याची जगभरात चर्चा झाली होती.


'हे' वाचलंत का :

  1. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामुळे मुंबईत रस्त्यावर नाकाबंदी, सामान्य नागरिकांना फटका - ANANT AND RADHIKA WEDDING
  2. अनंत अंबानी - राधिका मर्चंटच्या हळदीमध्ये सलमान खान, रणवीर सिंगसह सिने स्टार्सनं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - Anant and Radhika wedding
  3. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील जस्टिन बीबरनं शेअर केले खास फोटो आणि व्हिडिओ - Anant Radhika Sangeet Nigh

ABOUT THE AUTHOR

...view details