महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case - PUNE HIT AND RUN CASE

Pune Hit And Run Case : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळं वातावरण चांगलच तापलय. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका आमदाराचं नावही पहिल्या दिवसापासून याप्रकरणात येत आहे. त्यामुळं या आमदाराला अजित पवार (Ajit Pawar) यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Pune Hit And Run Case
हिट अँड रन प्रकरण (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 4:44 PM IST

पुणे Pune Hit And Run Case :पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका आमदाराचं नावही पहिल्या दिवसापासून येत आहे. याप्रकरणी आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या या आमदाराला झापल्याची माहिती समोर येत आहे. आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?' अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी या आमदाराला खडे बोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


आमदार पोहोचले होते पोलीस ठाण्यात : पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या रात्री अल्पवयीन तरुणाला अटक झाल्यावर ते आमदार चक्क येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळं राष्ट्रवादीचे हे आमदार नक्की कोणाला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर त्या आमदारांनी याआधी खुलासा देखील केला आहे. मात्र या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे त्या आमदारावर नाराज असल्याची माहिती आहे.


बैठकीला गैरहजर होते : काही दिवसापूर्वी अजित पवार गटाची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीला हे आमदार गैरहजर होते. बैठकीला का गैरहजर राहिले याबाबत आता चर्चांना उधाण आलंय. पुणे हिट अँड रन प्रकरणात अजित पवार यांनी आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?' अशा शब्दांमध्ये त्या आमदाराला खडे बोल सुनावलेत.


आमदारावर अजित पवार नाराज :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे हे आमदार असून, पहाटेच्या शपथविधीपासून ते राष्ट्रवादी फुटीनंतर देखील सर्वप्रथम अजित पवार यांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या या आमदारावरच अजित पवार हे आता नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा -

  1. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case
  2. डॉ. अजय तावरे राहत असलेल्या सोसायटीतील नागरिक आक्रमक; म्हणाले, इथं राहायची लाज.... - Pune Hit And Run Case
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case

ABOUT THE AUTHOR

...view details