महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या हजारो कामगारांना न्याय मिळणार, ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी केले आश्वासित - Supermax Company Workers Issue

Supermax Company Workers Issue : ठाणे येथील सुपरमॅक्स कंपनीतील काही कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून नोकरीवरून काढण्यात आले होते. याविरुद्ध त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेतल्याने हजारो कामगारांना न्याय मिळणार असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.

Supermax Company Workers Issue
कामगार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 10:59 PM IST

ठाणेSupermax Company Workers Issue :ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या शेकडो कामगारांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सहा तास ठिप्या आंदोलन केले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी या कामगारांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्रांनी दिल्याचे कामगारांनी सांगितले.

वाद न्यायालयात कायम :ठाण्यातील तीनहात नाका येथे १९४९ पासून सुपरमॅक्स (विद्युत मेटालिक्स) ही ब्लेड उत्पादन करणारी कंपनी आहे. मूळ मल्होत्रा यांच्या मालकीची ही कंपनी सध्या लंडनस्थित ऍक्टिस ही संस्था चालवते. या कंपनीत १२६० कामगार काम करतात. कोविड काळापासून कंपनी तोट्यात चालत असल्यानं २१ नोव्हेंबर २०२२ पासून कंपनीतील सर्व आपरेशन्स ठप्प होऊन ५ डिसेंबर २०२२ पासून टाळेबंदी करण्यात आली. दरम्यान, सुपरमॅक्स कंपनीचा हा वाद कामगार न्यायालयात पोहचला.

शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत दोन तास बैठक :कंपनीच्या संचालकांनी आणि व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना दोषी ठरवल्याचं कामगारांनी सांगितलं. तेव्हापासून आजतागायत १२६० कामगारांचे संसार रस्त्यावर आले असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वारंवार विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने करूनही व्यवस्थापन लक्ष देत नसल्याने गुरुवारी शेकडो संतप्त कामगार मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील निवासस्थाना बाहेर ठिय्या मांडून बसले. अखेर सुपरमॅक्स कंपनीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत दोन तास बैठक पार पडली. त्यानुसार, सरकार कामगारांप्रती अनुकुल असून येत्या दोन ते तीन दिवसात ठोस निर्णय येणार असल्याची माहिती कामगारांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेतल्याने हजारो कामगारांना न्याय मिळणार असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. "महाविकास आघाडीला विधानसभेत..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार, संघाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार - Chandrashekhar Bawankule
  2. करण जोहरला दिलासा; 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती - Karan Johar
  3. राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी 'एनडीए'च्या घटक पक्षांकडून वाढला जोर; भाजपाचा थेट विरोध? - Muslim Reservation

ABOUT THE AUTHOR

...view details