मुंबई Director Swapna Waghmare Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरातील बेडरूममध्ये घुसून चोरट्यानं पर्समधील सहा हजार रुपये चोरले होते. याप्रकरणी 25 ऑगस्टला अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांनी दिली आहे. अटक आरोपीचं नाव अनिकेत मूर्ति काउंडर (वय 19) असं आहे. अंबोली पोलीस ठाणे हद्दीतील मराठी चित्रपट दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या शबरी हॉटेल जवळ असलेल्या घरी रात्री घरफोडी केलेल्या आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305,331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - The money was stolen - THE MONEY WAS STOLEN
Director Swapna Waghmare Joshi : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरी चोरी झाली. याप्रकरणी एका आरोपीला पकडण्यात आलं आहे.
Published : Aug 28, 2024, 2:27 PM IST
चित्रसृष्टीतील दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरात चोरी : गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, स्वप्ना वाघमारे जोशी यांचे जावई देवेन हरीश लोहाना आणि मुलगी सौमिता हे त्यांच्या घरी राहतात. 25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सकाळी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या रूममध्ये एक अज्ञात चोरानं सहाव्या माळ्यावरील घरात, पाईपावरून खिडकीतून प्रवेश केला आणि त्यांच्या मुलीच्या पर्समधून पैसे चोरी करीत असताना त्यांच्या जावयानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेला. त्यानंतर जावई देवेन यांनी चोर चोर असे आरडा ओरडा केला असता, त्यांची सासू स्वप्न वाघमारे जोशी या जाग्या झाल्या. तेव्हा त्यांनी घरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला अनोळखी इसम 3.17 वाजता हॉलमधील खिडकीतून घरात प्रवेश करून, सर्वत्र चोरीस काय मिळते याची पाहणी करत होता. त्यानंतर त्यानं बेडरूममध्ये पर्समधून काही पैसे चोरी केले. यानंतर देवेन यांच्या पत्नीनं सांगितलं की, तिच्या पर्समधून रोख रक्कम सहा हजार रुपये दिसून येत नाही. यावरून तक्रारदार स्वप्ना वाघमारे जोशी यांची खात्री झाली की, घरात प्रवेश केलेल्या इसमानं पर्समधून एकूण रोख रक्कम 6000 रुपये चोरी केले आहे.
वॉन्टेड आरोपीला अटक :पोलिसांनी यागुन्ह्याचा तपास चालू करून घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करून, या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरील फुटेज तसंच गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी अनिकेत काउंडर अंधेरी पश्चिम येथील सिद्धार्थ नगर झोपडपट्टीत राहतो. त्याच्या विरोधात जुहू, डी एन नगर, वर्सोवा तसंच अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.