महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलढाण्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीचा एन्काऊंटर करण्याची आमदार मिटकरींची मागणी - BULDHANA CRIME NEWS

बुलढाणा जिल्ह्यात 21 वर्षीय नराधमानं साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली.

BULDHANA CRIME NEWS
बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2025, 8:34 PM IST

Updated : Feb 7, 2025, 9:14 PM IST

बुलढाणा : जिल्ह्यात 21 वर्षीय नराधमानं साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम हा मध्यप्रदेशातील डोईफोडिया गावचा रहिवासी आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी अटकेत :अत्याचार प्रकरणी नराधमावर सोनाळा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिच्यावर अकोला येथील रूग्णायलयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कॉनस्टेबल परमेश्वर तीतरे, पोलीस कॉनस्टेबल राहुल पवार करत आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी आणि डॉक्टर (ETV Bharat Reporter)

पीडिता रुग्णालयात दाखल : बुलढाण्यातील एका 4 वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षीय तरुणानं अत्याचार केला. या पीडित चिमुकलीवर अकोल्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सध्यास्थित तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय. "पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला जवळपास दीड महिना लागणार आहे," अशी माहिती अकोला शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉली बाशानी यांनी दिली.

आरोपीचा एन्काऊंटर करावा - आमदार अमोल मिटकरी :बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायेत. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेवर आमदार अमोल मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केला. "आरोपीचा एन्काऊंटर करण्यात यावा," अशी थेट मागणी मिटकरींनी गृहमंत्र्यांकडं केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विचारणा केली.

हेही वाचा :

  1. बोईसरमध्ये कालबाह्य खतांची विक्री; शेतकऱ्यांच्या पिकांना फटका, कृषी विभागाचं दुर्लक्ष
  2. लाडक्या बहिणींना 'दे धक्का'! पाच लाख महिला अपात्र; कारण काय?
  3. सुशांत सिंह राजपूत अन् दिशा सालियन मृत्यूप्रकरणी जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार
Last Updated : Feb 7, 2025, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details