पुणे Rape Of Minor Girl : शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पार्टीसाठी घरी घेऊन जाऊन दारू पाजून तिच्याच मित्राकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन मित्रांनी बलात्कार केला आहे तर यात एका मैत्रिणीचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन मध्येचारही अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl - RAPE OF MINOR GIRL
Rape Of Minor Girl - पुण्यात शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना एप्रिल महिन्यातील आहे. मात्र संबंधित मुलीच्या विचित्र वागण्यामुळे आता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published : Aug 21, 2024, 1:08 PM IST
जबरदस्तीने दारू पाजली -याबाबत अधिक माहिती अशी की, हा सगळा प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण हे घराजवळ राहतात. त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती. आरोपी मैत्रिणीनं पीडित तरुणीला घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेलं. पीडित तरुणीला रिक्षात बसवून ती घेऊन गेली होती. या मैत्रिणीनं तिच्या मित्रांनासुद्धा पार्टीसाठी बोलवलं होतं. यादरम्यान मित्राच्या घरी हा सगळा प्रकार घडला. पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर तिच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केला. दारूच्या नशेत असलेल्या पीडित तरुणीला या सगळ्याबाबत काहीच कल्पना नव्हती. याचाच फायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी केलेल्या कृत्याचा तसंच एकूणच घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला.
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल -चार महिन्यानंतर मुलीच्या वागणुकीत बदल दिसू लागल्यामुळे घरच्यांनी तिला प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार समोर आला आणि या नंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.