मुंबई TOP 100 TESTY ICE CREAMS : आइस्क्रिम खायला कुणाला आवडत नाही? काही अपवाद वगळले तर सगळ्यांनाच आइस्क्रिम खायला आवडतं. आपण कधी-कधी म्हणतो की आमच्या गावातल्या या आइस्क्रिमवाल्याचं आइस्क्रिम जगात भारी आहे. काय चव असते म्हणून सांगतो... अशी बढाई मारणारे आइस्क्रिम शौकीन आपल्याला प्रत्येक गावात दिसून येतील. या आइस्क्रिम प्रेमींना आइस्क्रिम खायला उन्हाळ्याची वाट पाहावी लागत नाही. ते कोणत्याही सिझनमध्ये आइस्क्रिम खायला तयार असतात. अगदी थंडीचे दिवस असो किंवा पावसाळा... भर पावसात चहा आणि भजी खाण्यात जी मजा आहे, तीच किंवा त्यापेक्षा जास्त मजा भार पावसात आइस्क्रिम खाऊन या शौकीनांना मिळते. त्यामुळे बाहेर पाऊस सुरू असताना आइस्क्रिम पार्लरमध्ये मलईदार कोन-कुल्फी किंवा स्कूपवर ताव मारताना शौकीन तुम्हाला दिसतील. पण शौकीनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांना आवडणारी गोष्ट सर्वाधिक चांगली कुठे मिळते ते शोधत असतात. असाच जगात भारी १०० आइस्क्रिमचा शोध लावण्यात आलाय. त्यामध्ये भारतातील पाच आइस्क्रिमची निवड करण्यात आलीय.
जगात भारी आइस्क्रिम म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे भारतातील काही नामवंत ब्रँडची नावं आली असतील. साहजिकच आहे म्हणा. उन्हाळ्याच्या तोंडावर अशी काही जाहिरात या आइस्क्रिम कंपन्या करतात की, ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. पण थांबा जरा... जाहिरातबाजी करणाऱ्या भारतातील कोणत्याच ब्रँडचा समावेश जगात भारी आइस्क्रिमच्या यादीत नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातच जसं एखादा आइस्क्रिमवाला असतो ना, तशीच ही सर्वोत्तम आइस्क्रिम आहेत. यामध्ये भारतातील ५ आइस्क्रिमचा समावेश आहे. त्यात तब्बल ३ आइस्क्रिम मुंबईतील आहेत.
आता आपली उत्सुकता चांगलीच ताणली गेली असेल. तर वेळ न लावता या आइस्क्रिमबद्दल जाणून घेऊया...
PABBA आइस्क्रिम पार्लरची Gadbad आइस्क्रिम - यातलं पहिलं आहे PABBA या आइस्क्रिम पार्लरमधील Gadbad आइस्क्रिम. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये PABBA आइस्क्रिम पार्लर आहे. या आइस्क्रिम पार्लरमधील अप्रतिम आइस्क्रिम तयार करतात. यामध्ये ताज्या फळांच्याबरोबरच काजु-पिस्ते-बदाम अशा सुख्यामेव्याचाही वापर करण्यात येतो. एवढंच नाही तर जेली आणि विशिष्ठ सरबतातून हे आइस्क्रिम सर्व केलं जातं. तीन वेगवेगळ्या फ्लेवरचं हे आइस्क्रिम मिळतं. त्यामुळे याची गोडी आणि चव अशी काही असते की 'जिसका नाम वो च...! असे उद्गार आपसुकच आपल्या तोंडातून बाहेर पडतात.