हरारे ZIM vs AFG 1st ODI Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल.
घरच्या मैदानावर विजयाची प्रतिक्षा : झिम्बाब्वे क्रिकेट संघानं गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतील एका सामन्यात आश्चर्यकारक विजय नोंदवला, परंतु उर्वरित दोन सामने गमावले आणि मालिका 1-2 नं गमावली. याआधी वर्षाच्या सुरुवातीलाही त्यांना श्रीलंकेविरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखालील संघानं घरच्या परिस्थितीचा फायदा उठवत अफगाणिस्तानला पराभूत करणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरुन आगामी सामन्यांपूर्वी विजयाची मालिका साधता येईल. विशेष म्हणजे झिम्बाब्वेनं आतापर्यंत एकदाही अफगाणिस्तानला पराभूत केलेलं नाही. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत सहा वनडे मालिका झाल्या आहेत, यात एक मालिका बरोबरीत झाली तर अफगाणिस्ताननं 5 मालिका जिंकल्या आहेत.
अफगाणिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी : दुसरीकडे, अफगाणिस्ताननं अलीकडंच शारजाहमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सलग 2-1 मालिका विजय नोंदवला. झिम्बाब्वेविरुद्धची ही मालिका 2025 मध्ये पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी महत्त्वाची आहे. रशीद खान, मोहम्मद नबी आणि फझलहक फारुकी यांसारखे अफगाणिस्तानचे पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट सुपरस्टार देखील संघाचा भाग आहेत. हा सामना दोन्ही संघांना आपली ताकद दाखवण्याची उत्तम संधी असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यापैकी झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत, तर अफगाणिस्ताननं 18 वेळा विजय मिळवला आहे. वनडे प्रकारात अफगाणिस्तानचं झिम्बाब्वेवर बरंच वर्चस्व असल्याचे या विक्रमावरून दिसून येतं. दोन्ही संघांमधील सामना हा नेहमीच रोमांचक असतो, विशेषतः जेव्हा झिम्बाब्वे घरच्या मैदानावर खेळत असतो. आगामी मालिकेत दोन्ही संघांना आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 12.30 वाजता होईल.