ETV Bharat / sports

BGT मध्ये 5 सामन्यांत 184 धावा, मात्र श्रीलंकेत एकाच डावात 'डबल सेंच्युरी'; थेट 'डॉन'ची बरोबरी - USMAN KHAWAJA RECORD

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या उस्मान ख्वाजानं श्रीलंकेत येताच त्याचं पहिलं कसोटी द्विशतक झळकावलं आहे.

Usman Khawaja
उस्मान ख्वाजा (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 30, 2025, 3:51 PM IST

गॉल Usman Khawaja : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या उस्मान ख्वाजानं श्रीलंकेत येताच त्याचं पहिलं कसोटी द्विशतक झळकावलं आहे. ही खेळी देखील विक्रमी आहे कारण श्रीलंकेत कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजानं झळकावलेलं हे पहिलंच द्विशतक आहे. आउट होण्यापूर्वी उस्मान ख्वाजानं 352 चेंडूत 232 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली.

सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी : ख्वाजानं त्याच्या द्विशतकी खेळीदरम्यान फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगलं कौशल्य दाखवलं. अचूकतेनं स्वीप आणि रिव्हर्स-स्वीप मारले.उस्मान ख्वाजानं 38 वर्षे 43 दिवसांच्या वयात द्विशतक झळकावून एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. 38 वर्षे किंवा त्याहून अधिक वयात द्विशतक करणारा ख्वाजा आता सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. उस्मान ख्वाजानं 290 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं आपलं द्विशतक पूर्ण केलं, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिलंच द्विशतक आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडसोबत सलामीला आलेला उस्मान ख्वाजानं दुसऱ्या दिवशी तसंच पहिल्या दिवशीही उत्तम लयीत खेळ केला. बीजीटीमध्ये पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजा पूर्णपणे अपयशी ठरला. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यानं काही धावा केल्या असल्या तरी, संपूर्ण मालिकेत तो 200 धावांचा टप्पाही गाठू शकला नव्हता. त्यानं 5 सामन्यांच्या 10 डावात एकूण 184 धावा केल्या, ज्याची सरासरी 20.44 होती.

टीकाकारांना चोख उत्तर : 2016 मध्ये, डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा याच मैदानावर एकाच दिवशी दोनदा बाद झाला होता. उस्मान ख्वाजा फिरकी गोलंदाजी खेळू शकत नाही असं म्हटलं जात होतं, पण आता तो 2025 मध्ये फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत आहे आणि श्रीलंकेत कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. मालिकेपूर्वी त्यानं निवृत्तीबाबत एक विधानही दिलं होतं आणि म्हटलं होतं की जर ऑस्ट्रेलियन संघाला वाटत असेल की त्याची गरज नाही तर तो कसोटी क्रिकेट सोडेल. मात्र आता त्यानं द्विशतक झळकावून सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.

श्रीलंकेत विदेशी फलंदाजानं केलेच्या सर्वोच्च कसोटी धावा :

  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 333 धावा, गॉल, 2010
  • स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) - 274* धावा, कोलंबो (आरपीएस), 2003
  • उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) - 232 धावा, गॉल, 2025
  • जो रुट (इंग्लंड) - 228 धावा, गॉल, 2021
  • ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) - 221 धावा, कोलंबो (एसएससी), 2001
  • सौद शकील (पाकिस्तान) - 208* धावा, गॉले, 2023
  • सचिन तेंडुलकर (भारत) - 203 धावा, कोलंबो (एसएससी), 2010
  • वीरेंद्र सेहवाग (भारत) - 201* धावा, गॉल, 2008
  • अब्दुल्ला शफीक (पाकिस्तान) - 201 धावा, कोलंबो (एसएससी), 2023
  • मुशफिकुर रहीम (बांगलादेश) - 200 धावा, गॉल, 2013

याशिवाय ख्वाजानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं दिनेश चंडिमलचा विक्रम मोडला आहे. जुलै 2022 मध्ये गॉल इथं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात, चंडिमलनं श्रीलंकेकडून 326 चेंडूत नाबाद 206 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. 2/6... शतकानंतर लॉर्ड ठाकूरची गोलंदाजीत हॅटट्रिक; मेघालयची शरणागती
  2. T20, T10, द हंड्रेड नंतर आता क्रिकेटचा आणखी एक नवा फॉरमॅट; भारतात होणार मॅचेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.