दांबुला (श्रीलंका) INDW vs PAKW Asia Cup T20I : भारतीय महिला क्रिकेट संघानं महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 109 धावांचं लक्ष्य होतं. जे मंधाना आणि शेफालीच्या स्फोटक खेळीच्या जोरावर त्यांनी 14.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केलं. या स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना 21 जुलै रोजी युएई विरुद्ध याच मैदानावर होणार आहे.
भारतीय सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी : भारतीय सलामीवीर स्मृती मंधानानं 45 धावांची आणि शेफालीनं 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेफाली आणि मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी 57 चेंडूत 85 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. पाकिस्तानकडून सईदा अरुब शाह हिनं 2 विकेट घेतल्या मात्र तोपर्यंत सामना पाकिस्तानच्या हातातून निसटला होता.
भारताची घातक गोलंदाजी : या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र गोलंदाजांची चमकदार कामगिरी आणि भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक तीन, तर पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग ठाकूरनं प्रत्येकी दोन बळी घेतले. पाकिस्ताकडून सिद्रा अमीननं सर्वाधिक 25 धावांचं योगदान दिलं.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड काय : महिला आशिया कप टी 20 स्पर्धेत भारतानं यापुर्वी 20 पैकी 17 सामने जिंकले आहेत. 2022 च्या फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. भारतानं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 14 सामन्यांमध्ये भारतानं 11 विजय नोंदवले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली, कारण तीन टी 20 सामन्यांपैकी दुसरा सामना पावसामुळं वाहून गेला. तर मे महिन्यात इंग्लंडकडून 3-0 नं पराभूत झाल्यानं पाकिस्तानचं मनोबल मात्र खचलेलं असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारत :शेफाली वर्मा, स्मृती मानधना, दयालन हेमलथा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर
- पाकिस्तान : सिद्रा अमीन, गुल फेरोजा, मुनिबा अली (यष्टिरक्षक), निदा दार (कर्णधार), इरम जावेद, फातिमा सना, सादिया इक्बाल, नशरा संधू, तुबा हसन, सईदा अरुब शाह
हेही वाचा :
- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा; टी 20 संघात कर्णधाराचा 'सुर्यो'दय - Team India
- इंग्लंडनं रचला इतिहास...! 26 चेंडूत केलं असं काही, जे 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घडलं नाही - Fastest Team Fifty in Test