सिडनी Why Team India Wear Pink Jersey :भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात रविवारी सिडनी इथं खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं गुलाबी शेड असलेला किट परिधान केली होती. जेन मॅकग्रा डेच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला. दिवसाच्या सुरुवातीपूर्वी, भारतीय संघानं माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅकग्राला स्वाक्षरी केलेली टोपी दिली. ग्लेन मॅकग्राची पत्नी जेन यांचं ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ, सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळल्या गेलेल्या वर्षातील पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस पिंक डे म्हणून साजरा केला जातो.
2005 मध्ये फाऊंडेशनची स्थापना :मॅकग्रा फाऊंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी सिडनी कसोटीचा तिसरा दिवस पिंक डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी स्टेडियम, आजूबाजूचे फलक आणि स्टंप देखील गुलाबी रंगात सजवले जातात. ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करणं हा त्याचा उद्देश आहे. ब्रेस्ट कॅन्सरनं जेन मॅकग्राच्या मृत्यूनंतर, तिचे पती ग्लेन मॅकग्रा यांनी 2005 मध्ये मॅकग्रा फाऊंडेशनची स्थापना केली. ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी आणि वाचलेल्यांसाठी जागरुकता आणि निधी उभारण्यासाठी फाऊंडेशन क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत काम करते.
अनेकांना होते मदत :जेन मॅकग्राची कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे. ब्रेस्ट कॅन्सरशी तिचा दीर्घकाळ संघर्ष होता. ग्लेन मॅकग्रा यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ या रोगाशी लढा देण्यासाठी अधिकाधिक लोकांना मदत करण्यासाठी या फाउंडेशनची स्थापना केली. मॅकग्रा फाऊंडेशन ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, संशोधनासाठी निधी उभारण्यासाठी आणि रुग्णांना मदत करण्यासाठी काम करते.
भारताचा मालिकेत पराभव : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. यासह भारतीय संघानं ही मालिका 1-3 नं गमावली. भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात विजयानं केली होती. मात्र यानंतर भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही, त्यामुळं त्यांना मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ऑस्ट्रेलियाची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं WTC च्या अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे.
हेही वाचा :
- पहिल्यांदाच भारताशिवाय होणार WTC फायनल; 'या' दोन संघांमध्ये होणार महामुकाबला
- टीम इंडियाची राजवट संपुष्टात... दशकानंतर गमावली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी; कांगारुंचा मोठा विजय