महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'आर्यन'चं 'अनाया' होण्याआधी 'या' दिग्गज क्रिकेटपटूनं बदललं होतं लिंग - FIRST CRICKETER WHO CHANGED GENDER

संजय बांगर यांच्या मुलाच्या हार्मोन ट्रान्सफॉर्मेशनची सध्या जोरदार चर्चा आहे. पण आर्यनच्या आधी ट्रान्सजेंडर क्रिकेटर कोण होता? कोणत्या खेळाडूनं केलं लिंग परिवर्तन? वाचा सविस्तर

First Cricketer Who Changed Gender
डॅनियल मॅकगेहे आणि आर्यन ते अनाया (Instagram of danielle mcgahey and Ayana bangar)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 12, 2024, 3:12 PM IST

मुंबई First Cricketer Who Changed Gender :माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यनचा अनाया झाल्याची कहाणी आतापर्यंत तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला माहित आहे का जागतिक क्रिकेटचा असा कोणता खेळाडू आहे ज्यानं आर्यन बांगरच्या आधी आपलं लिंग परिवर्तन केलं आहे? तर तो कॅनडाचा खेळाडू असून त्याचं नाव डॅनियल मॅकगेहे आहे. डॅनियल हा क्रिकेटपटू आहे पण नंतर ICC चा एका नियम त्याच्या मार्गात अडथळा ठरला आणि त्यानं स्वतःला क्रिकेटपासून दूर केलं.

कोण आहे डॅनियल मॅकगेहे :डॅनियल मॅकगेहेचा जन्म एप्रिल 1994 मध्ये ऑस्ट्रेलियात झाला. आयुष्याची 26 वर्षे घालवल्यानंतर त्यानं फेब्रुवारी 2020 मध्ये कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन खेळाडूनं मे 2021 मध्ये त्याचं वैद्यकीय संक्रमण सुरु केल्यानंतर लगेचच क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅनडाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर डॅनियलला कॅनडाच्या महिला क्रिकेट संघात संधी मिळू लागली. त्यानंतर कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात सामील होणारी डॅनिएल ही पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटरही बनली. तिनं 2023 महिला T20 राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिच्या संघ कॅनडासाठी केवळ 3 डावात 237 धावा करत चमकदार कामगिरी केली होती.

कशी आहे डॅनियल मॅकगेहेची क्रिकेट कारकिर्द : तिनं तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कॅनडासाठी एकूण 6 क्रिकेट सामने खेळले आहेत. परंतु तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही, कारण ICC नं निर्णय घेत म्हटलं होतं की ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाहीत. ICC च्या या नव्या निर्णयानंतर डॅनियलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि तिनं याबाबत कमालीची निराशाही व्यक्त केली होती.

ट्रान्सजेंडर क्रिकेटर्सबाबत ICC चा नियम काय : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर, ICC नं एक निवेदन जारी केलं की, जो खेळाडू आपलं लिंग पुरुष ते महिला बदलेल त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. मग तिनं कोणतीही शस्त्रक्रिया किंवा लिंग पुनर्असाइनमेंट उपचार केले असतील. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही (ECB) नुकताच हाच निर्णय लागू केला आहे. ECB नं ट्रान्सजेंडर महिलांना वरच्या स्तरावर खेळण्यास बंदी घातली आहे.

हेही वाचा :

  1. पाकिस्ताननं नकार दिल्यास कोणत्या देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी? समोर आली मोठी अपडेट
  2. आर्यन ते अनाया... दिग्गज भारतीय क्रिकेटपटूच्या मुलानं बदललं लिंग, स्वतः शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details