दुबई Shubhman Gill Top : आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ आमनेसामने आहेत आणि यासोबतच, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमनं आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गमावलं आहे. यावेळी त्याला रँकिंगमध्ये नुकसान झालं आहे. दरम्यान, भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज आणि 'प्रिन्स' शुभमन गिलनं अव्वल स्थान पटकावलं आहे.
India’s prolific batter and Sri Lanka’s ace spinner the big winners in the latest ICC Men’s Player Rankings ahead of the #ChampionsTrophy 🏏https://t.co/rUB3vR3dxh
— ICC (@ICC) February 19, 2025
शुभमन गिल अव्वल क्रमांकाचा फलंदाज : आयसीसीनं आजच नवीन वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यानुसार आता शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचं रेटिंग आता 796 पर्यंत वाढलं आहे. यापूर्वी शुभमन गिल 2023 मध्येही काही काळासाठी नंबर वनवर पोहोचला होता, पण नंतर बाबर आझमनं त्यावर कब्जा केला. बऱ्याच काळानंतर बाबर आझमला त्याची खुर्ची गमवावी लागली आहे. दरम्यान, बाबर आझम आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याला एक स्थान गमवावं लागलं आहे. त्याचं रेटिंग 773 आहे. असं असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या स्थानांमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आणखी काही बदल दिसू शकतात.
ICC ODI Ranking:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 19, 2025
1. Shubman Gill - 796 Rating.
2. Babar Azam - 773 Rating.
3. Rohit Sharma - 761 Rating.
- INDIAN OPENERS DOMINATING IN ODIS...!!! 🇮🇳 pic.twitter.com/86UfyaJVo2
रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर कायम : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचं सध्याचं रेटिंग 761 आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेननंही एका स्थानानं झेप घेतली आहे. तो आता 756 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल देखील दोन स्थानांनी पुढं सरकला आहे. तो 740 रेटिंगसह 5व्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
🚨 GILL IS THE NEW NO.1 BATTER. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 19, 2025
- Shubman Gill becomes the new No.1 Ranked ODI batter. 🇮🇳 pic.twitter.com/7pIMdDvnK3
सहाव्या क्रमांकावर विराट कोहली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं सहाव्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलं आहे. तो आता 727 च्या रेटिंगवर पोहोचला आहे. आयर्लंडचा युवा खेळाडू हॅरी टेक्टर या वेळी तीन स्थानांनी मागं पडला आहे. तो आता 713 रेटिंगसह 7व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या चरित अस्लंकानं मोठी झेप घेतली आहे. तो आता आठ स्थानांनी पुढं गेला आहे. त्याचं रेटिंग थेट 694 वर पोहोचलं आहे. भारताच्या श्रेयस अय्यरलाही दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो 679 रेटिंगसह 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा शाई होप दोन स्थानांनी घसरला आहे. त्याचं रेटिंग 672 आहे आणि तो दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा :