ब्रिस्बेन Timing for Gabba Test :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर सुरु झाला आहे, ज्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं विस्कळीत झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं ढगाळ वातावरण पाहता नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या सत्रात 13.2 षटकं टाकल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळं खेळ पुन्हा सुरु होऊ शकला नाही. अशा स्थितीत पंचांनी आता या सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांच्या सुरुवातीच्या वेळेत बदल जाहीर केले आहेत.
शेवटच्या चार दिवसांच्या खेळात 98 षटकं टाकली जातील :गाबा कसोटी सामन्यात पावसाची शक्यता आधीच होती, त्याचा परिणाम पहिल्या दिवसाच्या खेळावरही दिसून आला. पहिल्या सत्रात पावसामुळं पंचांना दोनवेळा खेळ थांबवावा लागला, त्यात पहिल्या सत्रात काही वेळानं खेळ पुन्हा सुरु झाला, मात्र दुसऱ्यांदा पाऊस सुरु झाल्यानं पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आता गाबा कसोटी सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांत एकूण 98 षटकं टाकली जाणार आहेत, ज्यात सामना निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी सुरु होईल. बीसीसीआयनं ट्विट करून माहिती दिली आहे की पुढील चार दिवसांचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे 5:20 वाजता सुरु होईल, जो पूर्वी पहाटे 5:50 वाजता सुरु होणार होता.
ऑस्ट्रेलियानं विकेट न गमावता 28 धावा केल्या : ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टाकलेल्या 13.2 षटकात ऑस्ट्रेलियन संघानं कोणतंही नुकसान न करता 28 धावा केल्या होत्या, ज्यात उस्मान ख्वाजा 19 आणि नॅथन मॅकस्वीनी 4 धावांवर नाबाद फलंदाजी करत होते. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल दिसले आहेत ज्यात हर्षित राणा आणि रविचंद्रन अश्विनच्या जागी आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघातील प्लेइंग 11 मध्ये स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेजलवूडचे पुनरागमन झालं आहे.
दहा वर्षानंतर झाली इतिहासाची पुनरावृत्ती :ब्रिस्बेनमधील ढगाळ वातावरण लक्षात घेऊन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह रोहित 10 वर्षांनंतर पहिला भारतीय कर्णधार बनला आहे ज्याने विदेशातील कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2014 मध्ये, जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर वेलिंग्टनच्या मैदानावर मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला होता, तेव्हा भारतीय कर्णधार एमएस धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो सामना अनिर्णित राहिला असताना विराट कोहलीच्या बॅटमधूनही शतकी खेळी पाहायला मिळाली.
हेही वाचा :
- इंग्रज गोलंदाजाचा 'कीवीं'विरुद्ध महापराक्रम... 43 वर्षांनंतर एखाद्या गोलंदाजानं केला 'असा' रेकॉर्ड
- IPL पूर्वी फ्रेंचायझीच्या भारतीय मालकाला मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक; क्रिकेट विश्वात खळबळ
- 28 महिन्यांनंतर आफ्रिकन संघानं जिंकली T20I सिरीज...!