महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

24 तासांत दुसरा सामना जिंकत 'साहेबां'चा संघ इतिहास घडवणार? ऐतिहासिक T20 मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - WI VS ENG 2ND T20I LIVE IN INDIA

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर आता पाच सामन्यांची T20 मालिका सुरु झाली आहे.

WI vs ENG 2nd T20I Live Streaming
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 10, 2024, 3:40 PM IST

बार्बाडोस WI vs ENG 2nd T20I Live Streaming : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच T20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडनं यजमान वेस्ट इंजिडचा 8 विकेट्सनं दारुण पराभव केला. यासह त्यांनी या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली, तर इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

वनडे मालिकेत इंग्लंडचा पराभव : या मालिकेपूर्वी या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यात यजमान वेस्ट इंडिजनं पाहुण्या इंग्लंडचा 2-1 नं पराभव केला. या मालिकेत इंग्लंडचं लियम लिव्हिंगस्टोननं पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व केलं होतं. मात्र यात त्याला यश आलं नाही. आता T20 मालिका जिंकत इंग्लंड संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तर वेस्ट इंडिजचा संघ मालिका जिंकत आपली विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या T20 सामन्यात काय झालं : पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. यानंतर इंग्लंडनं 183 धावांचं लक्ष्य अवघ्या 16.5 षटकांत पूर्ण केलं. त्यांच्याकडून फिलिप सॉल्टनं 54 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मधील त्याचं हे तिसरं शतक आहे. विशेष म्हणजे त्यानं तिन्ही शतकं फक्त वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. या सामन्यातही त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 T20 सामने खेळले गेले आहेत. यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा आहे. त्यांनी 17 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघानं 14 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजनं घरच्या मैदानावर 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघानं वेस्ट इंडिजमध्ये केवळ 4 सामने जिंकले आहेत. तर, अवे मॅचेसमध्ये वेस्ट इंडिजनं 4 सामने आणि इंग्लंडनं 9 सामने जिंकले आहेत. त्याचप्रमाणे तटस्थ मैदानावर वेस्ट इंडिजनं 3 सामने जिंकले असून इंग्लंडनं एक सामना जिंकला आहे.

खेळपट्टी कशी असेल :बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू आणि बॅटमध्ये समान स्पर्धा पाहायला मिळते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना बाऊन्ससह चेंडू स्विंग करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही या खेळपट्टीची मदत मिळते. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

मालिकेचं वेळापत्रक :

  • पहिला T20 सामना : 10 नोव्हेंबर (इंग्लंड 8 विकेटनं विजयी)
  • दुसरा T20 सामना : 11 नोव्हेंबर
  • तिसरा T20 सामना : 15 नोव्हेंबर
  • चौथा T20 सामना : 17 नोव्हेंबर
  • पाचवा T20 सामना : 18 नोव्हेंबर

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळला जाईल?

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) होणार आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं खेळवला जाईल?

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस इथं खेळवला जाणार आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना किती वाजता खेळवला जाईल?

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1.30 वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी मध्यरात्री 1 वाजता होईल.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना भारतात प्रसारित होणार नाही.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड आणि वेबसाइटवर केलं जाईल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, टेरेन्स हिंड्स, शाई होप, अकिल हुसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोटी, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड .

इंग्लंड :जोस बटलर (कर्णधार/यष्टिरक्षक), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, जफर चोहान, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, रेहान अहमद, फिल सॉल्ट, रीस टोपली, जॉन टर्नर.

हेही वाचा :

  1. विश्वविजेत्या 'कांगारुं'ची घरच्या मैदानावर सर्वात मोठी नाचक्की; 8187 दिवसांनंतर वनडे क्रिकेटमध्ये 'असं' घडलं
  2. 6,6,6,6,6,6,6...एका डावात 12 षटकार ठोकत केला विश्वविक्रम; महिला T20 क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं

ABOUT THE AUTHOR

...view details