सेंट किट्स WIW vs BANW 3rd ODI Live Streaming : बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज 24 जानेवारी (शुक्रवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं खेळला जाईल. तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजनं पहिला वनडे सामना सहज जिंकला होता, कॅरिबियन महिलांनी 199 धावांचं लक्ष्य 31.4 षटकांत नऊ विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. तथापि, दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशनं 185 धावांचं लक्ष्य सहजपणे राखलं आणि वेस्ट इंडिज सामन्यात 60 धावांनी मागे पडला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश महिला संघाचा कॅरिबियन संघाविरुद्धचा हा पहिलाच विजय होता.
मालिका सध्या बरोबरीत : सध्या ही मालिका 1-1 नं बरोबरीत असल्यानं तिसरा वनडे सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे कारण दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात वेस्ट इंडिज फेव्हरिट आहे, परंतु गेल्या सामन्यातील प्रभावी कामगिरीनंतर बांगलादेशलाही त्यांची दावेदारी मजबूत करायची आहे. हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजचं नेतृत्व करेल. जर तिनं फलंदाजीनं चांगली कामगिरी केली तर बांगलादेशी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. दरम्यान, पाहुण्या संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्यासाठी सांघिक कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : वेस्ट इंडिज महिला आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांमध्ये आतापर्यंत फक्त 3 आंतरराष्ट्रीय वनडे (WODI) सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज महिला संघानं 2 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेश महिला संघानं एका सामन्यात विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघात तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना आज 24 जानेवारी (शुक्रवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता खेळला जाईल. ज्याची नाणेफेक रात्री 11:00 वाजता होईल.