मुंबई Batter Out Thrice in 24 Hours :क्रिकेटमध्ये दिवसागणिक काही ना काही रेकॉर्ड होत असतात. यात काही रेकॉर्ड हे मोडले जातात तर काही अविश्वसनीय असतात. असाच एक रेकॉर्ड म्हणजे 24 तसांत तीन वेळा बाद होण्याचा आहे. हा अनोखा विक्रम पाकिस्तानच्या एका दिग्गज फलंदाजाच्या नावावर आहे.
कोणाच्या नावावर आहे विक्रम : पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. तो म्हणजे अवघ्या 24 तासांत तीन वेळा बाद होणारा उमर अकमल हा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज आहे. हा विक्रमही पहिल्यांदाच झाला आहे. मात्र, अकमलला अभिमान वाटावा असा हा विक्रम नाही. साहजिकच त्याला हा विक्रम कोणत्याही किंमतीत विसरायला आवडेल.
कसा झाला विक्रम :वास्तविक डिसेंबर 2015 मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन T20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात अकमल दोनदा बाद झाला होता. तो पाकिस्तानकडून फलंदाजीला आला तेव्हा केवळ 4 धावा करुन बाद झाला. मात्र यानंतर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यातही पाकिस्तान संघानं अकमललाचं फलंदाजीला पाठवलं त्यातही तो आउट झाला. त्याला ख्रिस जॉर्डननं बाद केलं होतं.
24 तासांत तीनदा आउट : या मालिकेत पाकिस्तानचा 3-0 असा पराभव झाला. यानंतर लगेच उमर अकमल बांगलादेश प्रीमियर लीगचा सामना खेळण्यासाठी पोहोचला. चितगाव संघाकडून खेळणाऱ्या अकमलला येथील पहिल्या सामन्यात केवळ 1 धाव करता आली. शाकीब अल हसनच्या चेंडूवर तो यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाला. अशाप्रकारे अवघ्या 24 तासांत तीनदा बाद होणारा अकमल पहिला खेळाडू ठरला.
हेही वाचा :
- न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या कर्णधाराला संघात स्थान नाही; नव्या कर्णधारासह श्रीलंका संघाची घोषणा
- असं कसं! खेळपट्टीवर घालवले 2 तास, 77 चेंडू खेळून झिरोवर आऊट, तरीही ठरला सामन्याचा 'हिरो'
- सौदी अरेबियात खेळाडूंवर 641 कोटी रुपयांची होणार उधळपट्टी; आतापर्यंत IPL लिलावात किती रुपये झाले खर्च?