ॲडलेड Fastest Hundred in Day-Night Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील डे-नाईट कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतानं पहिल्या डावात 180 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 337 धावा केल्या आहेत. यात ट्रॅव्हिस हेडनं ऑस्ट्रेलियासाठी दमदार शतक झळकावलं असून कसोटीत ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ट्रॅव्हिस हेडचं उत्कृष्ट शतक : ट्रॅव्हिस हेडनं डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. मैदानात तो भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचं कारण ठरला होता. त्यानं अवघ्या 111 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आणि डे-नाईट कसोटी सामन्यातील सर्वात वेगवान शतकाचा स्वतःचाच विक्रम मोडला. याआधी ट्रॅव्हिस हेडनंच 2022 साली इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात 112 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानं 141 चेंडूत 140 धावा केल्या.
दिवस-रात्र कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज :
- 111 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध भारत, 2024
- 112 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड, 2022
- 125 चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2022
- 139 चेंडू, जो रूट विरुद्ध वेस्ट इंडिज, 2017
- 140 चेंडू, असद शफीक विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016