महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेवटच्या षटकात 26 धावा करुनही पंजाब विजयापासून 'दोन पावलं' दूर; हैदराबादचा विजयाचा 'सुर्योदय' - PBKS vs SRH

IPL 2024 PBKS vs SRH : चंदीगढच्या मल्लापूर येथे झालेल्या आयपीएलच्या 23व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी पराभव केला. यासह हैदराबादनं या हंगामातील तिसरा विजय मिळवलाय.

शेवटच्या षटकात 26 धावा करुनही पंजाब विजयापासून 'दोन पावलं' दूर; हैदराबादचा रात्री 'सुर्योदय'
शेवटच्या षटकात 26 धावा करुनही पंजाब विजयापासून 'दोन पावलं' दूर; हैदराबादचा रात्री 'सुर्योदय'

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 7:27 PM IST

Updated : Apr 10, 2024, 6:41 AM IST

चंदिगढ IPL 2024 PBKS vs SRH : अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या चमकदार कामगिरीमुळं सनरायझर्स हैदराबादनं (SRH) इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील तिसरा सामना जिंकलाय. आपल्या पाचव्या सामन्यात, त्यांनी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध शेवटच्या षटकात 2 धावांनी विजय नोंदवला. हैदराबादनं या सामन्यात 64 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर नितीशनं 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तसंच गोलंदाजीत एक विकेटही घेतली.

शशांकचे प्रयत्न अपुरे : पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील हा सामना मंगळवारी चंदिगढच्या मल्लापूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघानं 183 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला 6 गडी गमावून 180 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून शशांक सिंगनं 25 चेंडूत 46 धावांची सर्वाधिक नाबाद खेळी खेळली. तर आशुतोष शर्मानंही 15 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे हैदराबाद संघाकडून भुवनेश्वर कुमारनं 2 बळी घेतले. पॅट कमिन्स, टी नटराजन, नितीश रेड्डी आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

हैदराबादची विजयी मालिका कायम : या मोसमात आतापर्यंत पंजाब आणि हैदराबाद संघांनी 5-5 सामने खेळले आहेत. त्यापैकी सनरायझर्स संघानं 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबनं फक्त 2 जिंकले आहेत. दोन्ही संघांनी आपला मागील सामना जिंकला होता. मात्र या सामन्यात पंजाबचा पराभव झाला. केवळ हैदराबादला विजयी मालिका कायम ठेवता आली. मागील सामन्यात सनरायझर्सनं चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता.

अर्शदीपची धारदार गोलंदाजी :या सामन्यात सनरायझर्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघानं केवळ 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितीश कुमार रेड्डीनं 32 चेंडूत अर्धशतक करत संघाचा डाव सावरला. त्यानं 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर अब्दुल समदनंही 12 चेंडूत 25 धावा करत त्याला साथ दिली. नितीश आणि अब्दुल यांनी सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली आणि संघाला 9 विकेट्सवर 182 धावांपर्यंत पोहोचवलं. पण या सगळ्यात पंजाब संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्यानं 4 षटकांत 29 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. हर्षल पटेल आणि सॅम कुरननं 2-2 विकेट घेतल्या. तर कागिसो रबाडाला 1 बळी मिळाला.

हेही वाचा :

  1. चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय - CSK vs KKR IPL 2024
  2. ठाकूरच्या 'यश'स्वी गोलंदाजीपुढं गुजरातच्या फलंदाजांचं लोटांगण; लखनौच्या नवाबांचा गुजरातविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात पहिलाच विजय - LSG vs GT
Last Updated : Apr 10, 2024, 6:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details