महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा धुमाकूळ, अवघ्या 19 चेंडूत 'खेळ संपला' - T20 World Cup 2024

T20 World Cup 2024 : प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानचा संघ 13.2 षटकांत अवघ्या 47 धावांत गडगडला. आदिल रशीदनं 4 तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं अवघ्या 3.1 षटकांत सामना जिंकला.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 10:32 AM IST

T20 World Cup 2024 ENG vs OMAN : इंग्लंडनं ओमानचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडनं सुपर-8 मध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. आदिल रशीदच्या 4-11 च्या चमकदार कामगिरीमुळं इंग्लंडनं गुरुवारी ओमानला 47 धावांत गुंडाळून टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 टप्प्यात पोहोचण्याच्या आपल्या शक्यता बळकट केल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ओमानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीसमोर ओमानचे फलंदाज चांगलेच फसले. तो 13.2 षटकात अवघ्या 47 धावांवर ऑलआऊट झाला. ओमानकडून शोएब खाननं सर्वाधिक 11 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चरनंही 3-3 बळी घेतले.

19 चेंडूत संपला सामना :ज्या खेळपट्टीवर ओमानचे फलंदाज सतत संघर्ष करताना दिसत होते. त्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी कहर केला. इंग्लंडनं अवघ्या 3.1 षटकात लक्ष्याचा पाठलाग केला, ज्यामुळं त्यांच्या निव्वळ धावगतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कर्णधार जोस बटलरनं 300 च्या स्ट्राईक रेटनं 8 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. फिल सॉल्टनं 3 चेंडूत 12 तर जॉनी बेअरस्टोनं 2 चेंडूत 8 धावा केल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्ला यांनी 1-1 बळी मिळवला.

इंग्लंडचा विजय स्कॉटलंडसाठी डोकेदुखी :ग्रुप बी मधून 3 पैकी 3 सामने जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. 3 पैकी 2 सामने जिंकल्यानंतर आणि एक पावसामुळें वाहून गेल्यानंतर स्कॉटलंड 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, इंग्लंडचा निव्वळ धावगती स्कॉटलंडपेक्षा चांगला नव्हता. पण ओमानवर मोठा विजय नोंदवल्यानंतर इंग्लंडचा निव्वळ धावगती (+3.081) स्कॉटलंड (+2.164) पेक्षा चांगला झाला आहे. मात्र, इंग्लंडचे सध्या 3 सामन्यांत 3 गुण आहेत. जर त्यांनी त्यांचा पुढील सामना नामिबियाविरुद्ध जिंकला आणि स्कॉटलंडनं त्यांचा शेवटचा गट स्टेज सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला तर इंग्लंड सुपर-8 साठी पात्र ठरेल.

  • सर्वात मोठा विजय नोंदवला :इंग्लंडनं ओमानचा पराभव करून टी-20 मधील सर्वात मोठा विजय (101 चेंडू शिल्लक असताना) नोंदवलाय. त्यांचा यापूर्वीचा सर्वात मोठा विजय (70 चेंडू शिल्लक असताना) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध होता.

हेही वाचा

  1. नागपूरच्या 'दिव्या देशमुख'नं पटकावलं विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद; 15 वर्षानंतर पदकाचा संपला दुष्काळ - DIVYA DESHMUKH News
  2. टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive
  3. पुसदच्या देव चौधरीनं सातासमुद्रापार रचला इतिहास! कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये 97 वर्षात रौप्य पदक मिळवून देणारा पहिला भारतीय - Comrades Marathon

ABOUT THE AUTHOR

...view details